HomeमनोरंजनSaif Ali Khan And kareena Kapoor : अशी आहे सैफ आणि...

Saif Ali Khan And kareena Kapoor : अशी आहे सैफ आणि करीनाची लव्ह स्टोरी

Subscribe

बॉलिवूड म्हटले की अफेर्स, लग्न आणि डिव्होर्स या सर्व गोष्टींची चर्चा आलीच. आपण आजपर्यत असे अनेक बॉलिवूड कपल पाहिले असतील, ज्यांचे डिव्होर्स तर काहींची अधुरी प्रेम कहाणीच राहीली. पण, यातील हातांच्या बोटांवर मोजता येतील अशा कलाकारांनी आपलं प्रेम टिकवत संसार सुरू ठेवलाय. यांपैकी एक म्हणजे बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल सैफ अली खान आणि करीना कपूर खान. सैफ अली खान आणि करीना कपूर खान नेहमीच चर्चेत असतात. त्यांची लव्ह स्टोरी सूद्धा हटके आहे. 2012 मध्ये त्या दोघांनी लग्नगाठ बांधली. आज त्या दोघांचा संसार सुखाने सुरू असून त्यांना दोन मुले आहेत. पण, त्यांचे सूत नक्की जुळलं कस? त्यांची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली हे जाणून घेऊयात.

सैफ आणि करीना यांची भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली असल्याचे बोलले जाते. टशन असे या चित्रपटाचे नाव आहे. 2008 साली आलेला टशन या चित्रपटात अक्षय कुमार, सैफ अली खान आणि करीना कपूर मुख्य भुमिकेत होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. या आधीही त्यांनी एकमेकांना डेट केलं होतं. पण, टशनदरम्यान त्यांना एकमेकांवर असलेल्या प्रेमाची जाणीव झाली.

सैफने करीनाला अत्यंत हटके पद्धतीने प्रपोज केले होते. तो करीनाला म्हणाला होता की, ‘मी काही आता 25 वर्षाचा नाही जो तुला रोज रात्री घरी सोडायला येईन’, यानंतर सैफ एवढेच करुन थांबला नाही, त्याने करीनाच्या आईकडेच थेट लग्नाचा प्रस्ताव पाठवला होता. खरं तर, आधीच डिव्होर्स त्यात दोन मुलं असल्याने करीनाची आई काय म्हणेल हे सांगण तसं कठीण होते. पण, करीनाच्या आईनेही या प्रेमाला होकार देत लग्नाला परवानगी दिली.

करिनाचा लग्नाला होता नकार

सैफने अनेकवेळा करीनाला प्रपोज केलं होत. त्याने करीनाला पहिल्यांदा एका बारमध्ये लग्नाची मागणी केली होती. पण, तेव्हा करीनाने नकार दिला. यानंतर सैफने करीनाला पुन्हा एकदा नोट्रे डेम चर्च येथे प्रप्रोज केले, तेव्हाही तिचा नकार होता. शेवटी त्याने करीनाला त्यांच्या बाबांची ट्रिक वापरून प्रपोज केलं. सैफ करीनाला पॅरिसला घेऊन गेला. कारण सैफच्या वडिलांनीही शर्मिला टागोर अर्थात त्यांच्या आईला पॅरिसमध्ये जाऊन प्रपोज केल होते. तेव्हा शर्मिला यांनी लग्नाला होकार दिला होता. सैफने करिनाला पॅरिसमध्ये प्रपोज केलं आणि त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली.

 

 

 

 

हेही पाहा –