घरमनोरंजनSaif and Kareena : 'आम्ही मुलांना जन्म देतो, पण…सैफ अली खानचं विधान...

Saif and Kareena : ‘आम्ही मुलांना जन्म देतो, पण…सैफ अली खानचं विधान चर्चेत

Subscribe

अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. मनोरंजन सृष्टीत घराणेशाहीवरुन सतत वाद होत असतात. त्यासोबत एक आणखी विषय आहे ज्याची कायम चर्चा सुरु असते. ती म्हणजे नेपोटिजम म्हणजेच घराणेशाही. निर्माता करण जोहरला नेपोटीझमवरुन बरच ट्रोल केलं गेलं. करण जोहर केवळ स्टारकिड्सलाच त्याच्या सिनेमामध्ये लाँच करतो अशी टीका केली जाते. सैफ अली खानने नुकतच एका मुलाखतीत स्टार किडवरुन प्रतिक्रिया दिली.

बॅालिवूडमध्ये सध्या कलाकारांपेक्षा जास्त स्टारकिड्सची चर्चा होते. सैफ अली खान आणि करीना कपूर यांना तैमूर आणि जेह अशी दोन मुले आहेत. सारा सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे तर इब्राहिमही पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. स्टारकिड्समध्ये तैमूर आणि जेह यांची देखील नावं आहेत. तैमूरनं तर काहीही केलं तरी देखील सोशल मीडियावर तो चर्चेत असतो. दरम्यान, आता करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले सैफ आणि करिना
तुमच्या आडनावाचा तुमच्या करिअरवर परिणाम होतो का? असा प्रश्न अनुपमा चोप्रा यांनी सैफ अली खान आणि करिनाला विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना सैफ म्हणाला, “ऑडियन्स हे स्टारकिड्समध्ये खूप इंटरेस्टेड असतात. स्टारकिड्सचे लोक सतत फोटो काढत असतात.
यावर करीना म्हणाली, “आडनावाचा फायदा तुम्हाला मिळत नाही जोवर तुम्ही टॅलेंट सिद्ध करत नाही. तुमचं अमुक एक आडनाव आहे याचा अर्थ हा नाही की तुमच्यात टॅलेंट आहे आणि तुम्हाला यशही मिळेल. याचा निर्णय तर प्रेक्षकच देणार आहेत. सध्याच्या सोशल मीडिया युगात स्टार असणं काही फार मोठं नाही.

सैफ अली खान या चर्चावर म्हणाला, “प्रेक्षकांनाच फार इंटरेस्ट असतो. आर्चीजचंच उदाहरण घ्या. या सिनेमाची किती चर्चा झाली. यातील स्टारकिड्सचे फोटो काढले, त्यांना फॉलो केलं गेलं, आता कोणाला किती मोठे करायचं हे प्रेक्षकच ठरवतात. तैमूर हा एकदा तायक्वांदोसाठी गेला होता. तिथे लोक त्याचे फोटो काढत होते, इंटरनेटवर त्याचे रील शेअर केले जात होते. आम्हाला असे अटेंशन नकोय. आम्ही स्टारकिड्स बनवत नाही. आम्ही मुलांना जन्म देतो. पण प्रेस, फोटोग्राफर्स आणि जनता त्या मुलांना ‘स्टारकिड्स’ बनवतात. जनतेला कदाचित निष्पापपणे फक्त स्टारकिड्स बघायचे असतात.”

- Advertisement -

सैफनं तैमूरबाबत सांगितलं, “तैमूरला अर्जेंटिनाचा लीड गिटारवादक किंवा फुटबॉलपटू व्हायचे आहे. त्याला अर्जेंटिनाला जायचे आहे जेणेकरून तो फुटबॉलपटू बनू शकेल.” त्यांच्या या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

हेही वाचा :

Esha Deol Divorce :’घरात शॉर्ट्स घालणं म्हणजे’… ईशा देओलने मांडली व्यथा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -