अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला हे प्रकरण बॉलिवूडकरांसाठी चिंतेचे कारण ठरले. यावरून अनेक कलाकारांनी आपल्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, सैफवर हल्ला झाल्यापासून त्याचे कुटुंबीय तणावात आहेत. प्रत्येकाच्या मनात हल्ल्याविषयी भीती बसली आहे. या हल्ल्यातून सुखरूप बचावल्यानंतर आता अभिनेत्याने आपल्या मुलांच्या सुरक्षेहेतू एक मोठा निर्णय घेतला आहे. सैफ आणि करीनाने सेलिब्रिटी फोटोग्राफर्स तसेच पॅपराझींना मुलांचे फोटो काढू नये, अशी विनंती केली आहे. (Saif Ali Khan and Kareena Restrict paps to take Photos of their childs)
कुटुंबाच्या सुरक्षेसाठी महत्वाचा निर्णय
अभिनेता सैफ अली खानवर झालेला हल्ला त्याच्या कुटुंबियांसाठी मोठा धक्का ठरलाय. या हल्ल्यातून अद्याप खान कुटुंबीय सावरलेले नाहीत. त्यामुळे अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पत्नी करीना कपूर यांनी आपल्या मुलांबाबत एक निर्णय घेतला आहे. जो त्यांच्या सुरक्षेच्या हेतूने अत्यंत महत्वाचा मानला जातोय. तसेच अभिनेत्याच्या घराबाहेर सिक्युरिटी देखील वाढवण्यात आली आहे.
सैफ अली खान आणि त्याची पत्नी करीना यांना दोन मुले आहेत. मोठ्या मुलाचे नाव तैमूर आणि लहान मुलाचे नाव जेह असे आहे. अनेकदा सैफ आणि करीना आपल्या मुलांसोबत स्पॉट होत असतात. अशावेळी साहजिकच त्यांचे फोटो पॅपराझींच्या कॅमेऱ्यात कैद होतात. जे सोशल मीडियावर ट्रेंड करतात. म्हणूनच अभिनेत्याने आणि त्याच्या पत्नीने पॅपराझींना मुलांचे फोटो काढू नये, अशी विनंती केली आहे. मात्र, सैफ आणि करीना एखाद्या इव्हेंटमध्ये स्पॉट झाले तर पॅपराझी त्यांचे फोटो काढू शकतात असेही त्यांनी म्हटले.
सैफ आणि करीनाची पॅपराझींना विनंती
एका नामांकित वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पत्नी करीना कपूरच्या पीआर मॅनेजरने पॅपराझींसोबत बैठक घेतली. या बैठकीत पीआरने सैफ आणि करीनाने दिलेल्या सर्व सूचना पॅपराझींपर्यंत पोहचवल्या. अभिनेत्याच्या कुटुंबाकडून पीआरने पॅपराझींना विनंती केली की, त्यांनी तैमूर आणि जहांगीरचे फोटो घेऊ नयेत. भले ते बागेत खेळत असतील, कुणाच्या बर्थडे पार्टीत सामील झाले असतील किंवा अन्य कुठेही स्पॉट झाले तरी त्यांचा पाठलाग करून फोटो काढू नये. ही बैठक मंगळवारी (28 जानेवारी) संध्याकाळी मुंबईत पीआरच्या खारमधील ऑफिसमध्ये घेण्यात आली.
सैफ अली खान हल्ला प्रकरण
अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारीच्या रात्री हल्ला झाला. चोरीच्या हेतून घरात शिरलेल्या इसमाने झटापटीत अभिनेत्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर मुंबईत लीलावती रुग्णालयात सर्जरी झाली. हल्ल्यानंतर 5 दिवसांनी तो रुग्णालयातून घरी परतला. अभिनेत्याच्या कुटुंबाला तो सुखरूप घरी पोहोचल्याचा आनंद होताच पण त्यासोबत मनात भीतीदेखील बसली होती. हल्ल्यानंतर सैफनेदेखील सुरक्षेकडे विशेष लक्ष देत घराबाहेरील सिक्युरिटी वाढवली. शिवाय अभिनेता रोहित रॉयच्या सुरक्षा कंपनीकडून गार्ड्सदेखील तैनात केले. या प्रकरणानंतर अभिनेत्याच्या सुरक्षेसाठी सरकारतर्फे कॉन्स्टेबलदेखील उभे करण्यात आले आहेत.
पॅपराझींच्या सक्रियतेमुळे कोणता सेलिब्रिटी कुठे जातोय? कुठून येतोय? काय करतोय? अशा प्रत्येक गोष्टीची माहिती मिळते. ज्याचा चोरांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो. अशावेळी आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत सैफ- करीनाने घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आणि महत्वाचा मानला जातो आहे.
हेही पहा –
Shah Rukh Khan : किंग खानची साऊथ स्टार्सना विनंती, म्हणाला – एव्हढ्या फास्ट नाचू नका