बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेला हल्ला हे प्रकरण अजूनही चर्चेत आहे. 15 जानेवारीच्या मध्यरात्री अभिनेत्यावर हल्ला झाला. ज्यात गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर सर्जरी करण्यात आली. सध्या अभिनेत्याची प्रकृती स्थिर असून याप्रकरणी पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. तरीही विविध प्रकारे पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरूच आहे. शिवाय अनेकांच्या मनात या प्रकरणाविषयी विविध प्रश्न घर करून बसले आहेत. यांपैकी एक प्रश्न असा की, गंभीर जखमी झाला असताना अभिनेत्याने आपल्या गाडीऐवजी रिक्षातून रुग्णालयात जाण्याचा निर्णय का घेतला? याबाबत तैमूरची एक्स नॅनी आणि सैफच्या घरी काम केलेली नर्स ललिता डिसिल्वा यांनी माहिती दिली आहे. (Saif Ali Khan Attack Case New Update)
जखमी अवस्थेत रिक्षातून रुग्णालयात का गेला सैफ?
एका इंटरव्ह्यूत ललिता डिसिल्वा यांना विचारण्यात आले की, ‘सैफ अत्यंत गंभीर जखमी होता. अशावेळी तो बिल्डिंगमधून खाली उतरून गाडीऐवजी रिक्षातून रुग्णालयात का गेला?’ यावर उत्तर देताना ललिता यांनी सांगितले, ‘मिस्टर सैफ सरांनी त्यांच्याकडे कामावर असलेल्या लोकांसाठी जवळपास राहण्याची सोय केली आहे. त्यामुळे जेव्हा कोणतेही काम नसते आणि रात्री कुठे जायचे नसेल तेव्हा अशा लोकांना ते विश्रांतीसाठी पाठवून देतात’.
‘काम नसेल तेव्हा सैफ सर त्यांना सांगतात की, आता काहीच काम नाहीये तुम्ही जाऊन झोपा आणि सकाळी या. यानंतर ते लोक जाऊन विश्रांती करतात. त्या बिल्डिंगमध्ये अशी कोणतीच सुविधा नाहीये ज्यात एखादा ड्रायव्हर रात्रभर तिथे थांबू शकेल किंवा तिथेच झोपू शकेल. त्यामुळे त्यांच्यासाठी बाहेर खोल्या घेतल्या आहेत. जिथे ते लोक आपल्या कुटुंबासोबत वास्तव्य करतात’.
यासोबत ललिता डिसिल्वा असेही म्हणाल्या की, सैफ आणि करीना दोघेही गाडी ड्राइव्ह करतात. पण त्यावेळी परिस्थिती अशी होती की, दोघेही अस्थिर होते. अशा परिस्थितीत ते ड्राइव्ह करू शकले नसते. सैफ सर तर ड्राइव्हिंग करण्याच्या अवस्थेतच नव्हते. एव्हढ्या जखमा घेऊन त्यांनी कसं ड्राइव्ह केलं असत?’ माहितीनुसार, हल्ल्याच्या दिवशी रात्री 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमारास सैफचा मोठा मुलगा इब्राहिम त्याला रिक्षाने लीलावती रुग्णालयातून घेऊन गेला होता. यानंतर अभिनेत्यावर सर्जरी झाली आणि अवघ्या ५ दिवसात तो सुखरूप घरी परतला.
हेही पहा –
Mahakumbh Stampede : महाकुंभातील दुर्घटनेवर प्रसिद्ध लोकगायिकेची संतप्त प्रतिक्रिया