घर मनोरंजन मला महाभारतातही काम करायला आवडेल...'आदिपुरुष'च्या वादानंतर सैफ अली खानची प्रतिक्रिया

मला महाभारतातही काम करायला आवडेल…’आदिपुरुष’च्या वादानंतर सैफ अली खानची प्रतिक्रिया

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या त्याच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकत्याच मागील 3-4 दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. ज्यावर सध्या सोशल मीडियावर विरोध केला जात आहे. या चित्रपटामध्ये सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे. प्रदर्शित करण्यात आलेल्या टीझरमध्ये रावणाच्या भूमिकेत असणाऱ्या सैफ अली खानच्या लूकवर नेटकरी संताप व्यक्त करू लागले आहेत. दरम्यान, या विरोधानंतर सैफ अली खानने आपल्या ड्रिम रोलबाबत खुलासा केला आहे. त्याने त्याच्या एका मुलाखतीत सांगितलं की, त्याला महाभारतामध्ये देखील काम करायचं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, एका मुलाखतीत सैफ अली खानने महाभारतामध्ये अभिनय करायला आवडेल असं सांगितलं. तसेच जेव्हा सैफ अली खानला ड्रीम रोलबाबत विचारण्यात आलं होतं तेव्हा तो म्हणाली की, मी असा विचार करत नाही. मी फक्त तोच विचार करतो जे मला दिलं जातं. खरं सांगायचे तर माझ्याकडे माझा कोणताही ड्रिम रोल नाही. मला नाही वाटतं की असा विचार करण्याची काही गरज आहे. तरीही मी जे करू इच्छितो ते महाभारतामध्ये काम करणं आहे. जर कोणी या चित्रपटाला ‘लॉर्ड ऑफ द रिंग्स’ प्रमाणे बनवेल.

- Advertisement -

अजय देवगणसोबत चालू आहे चर्चा
सैफ अली खानने खुलासा केला आहे की तो अभिनेता अजय देवगणसोबत यावर चर्चा करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली पुढे म्हणाला की, “आम्ही अजय देवगणसोबत कच्चे धागेनंतर पासून यावर बोलत आहे. महाभारत आमच्या पीढीमध्ये, स्वप्नांचा विषय आहे. शक्य झाल्यास आम्ही साउथसोबत बॉम्बे फिल्म इंडस्ट्रीला जोडू. महाभारतातील करण हे पात्र मला खूप आकर्षक वाटतं.”


हेही वाचा :

दिल्लीतील रामलीलेमध्ये प्रभासने केलं रावण दहन; व्हिडीओ व्हायरल

- Advertisement -
- Advertisement -
shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -