घरट्रेंडिंगVideo : तैमुरने 'या'साठी केला वडिलांकडे हट्ट

Video : तैमुरने ‘या’साठी केला वडिलांकडे हट्ट

Subscribe

तैमुरचा सध्या लंडनमधील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर कायम पॉप्युलर आणि सर्वात अधिक चर्चेत असलेला स्टार किड म्हणजे तैमुर अली खान. अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांचा तैमुर सोशल मीडियावर नेहमीच ट्रेडिंगमध्ये असतो. एवढ्या लहान वयामध्ये त्याचे असंख्य चाहते आहेत. नेटीझन्सच्या लाडक्या तैमुरचा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

Taimur is in playing mood on the set of his father ?

A post shared by Taimur ali khan (@taimuralikhanpataudiakanawab) on

- Advertisement -

या व्हिडिओमधून तैमुरचा दिवसेंदिवस चाहतावर्ग वाढत असल्याचे दिसून येत असून त्याची लोकप्रियता परदेशातही असल्याचे पाहायला मिळाले आहे. सध्या तैमुर त्याच्या आई वडीलांसोबत लंडनमध्ये सुट्टी एन्जॉय करत असून त्याचा येथील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

काय आहे व्हिडिओत

सैफ अली खान लवकरच जवानी जानेमनया चित्रपटामध्ये झळकणार असून या चित्रपटाचे सध्या लंडनमध्ये चित्रीकरण सुरु आहे. लंडनमध्ये सुरु असलेल्या चित्रीकरण दरम्यान तैमुर देखील आपल्या वडिलांसोबत तेथे गेला आहे. या सेटवरचा तैमुरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तैमुर सैफ अली खानसोबत मस्ती करताना दिसत आहे. तसेच तैमुर सैफकडे उचलून घेण्याचा हट्ट करत आहे. त्यामुळे सेटवरचे सारे जण त्याचा हा बालहट्ट पाहून आनंद व्यक्त करत आहेत.

- Advertisement -

या व्हिडिओमध्ये तैमुरने निळ्या रंगाची डेनिम जीन्स, पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि पायात बूट घातले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -