तैमूरनंतर धाकटा नवाब झाला स्टार किड, जेहचे फोटो झाले व्हायरल

तैमुरच्या जन्मानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर त्याचे नवनवे फोटो तुफान व्हायरल केले होते. अल्प कालावधीत तैमुर चाहत्यांचा ‘फेव्हरेट बेबी फेस’ झाला होता. पण आता चाहत्यांमध्ये धाकट्या नवाबला म्हणजेच करीना-सैफच्या दुसऱ्या मुलाला पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. नुकतचं करीना आणि सैफने त्यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर ठेवल्याचे माहिती समोर आली. मात्र या नावावरून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले.

करीना आणि सैफचा पहिला मुलगा तैमुर जन्मापासूनच चर्चेत आहे. अगदी तो दिसला रे दिसला की फोटोग्राफर्स त्याच्या दिशेने कॅमेरा वळवतात. दुसऱ्या क्षणी त्याचे नवे फोटो सर्वत्र व्हायरल होतात. बॉलिवूडचा सर्वात लोकप्रिय स्टार किड म्हणुनही तैमुरला ओळखले जाते. पण आता तैमुरचा फॅन फॉलोइंगमध्ये घट होत त्याच्या धाकट्या भावाचे फॅन फॉलोइंग वाढले आहेत.

आज पहिल्यांदाच सैफ आणि करीनाला त्यांच्या दुसऱ्या मुलासोबत मीडियाने स्पॉट केले. जेहच्या जन्मापासून करीना आणि सैफने जेहला मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. पण आज जेहची पहिली झळक पाहायला मिळाली. या धाकट्या नवाबचे नवे क्युट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तैमुरप्रमाणेच जेह देखील चाहत्यांचा व्हेवरेट होताना दिसतोय.

नेटकऱ्यांमध्ये करीनाच्या दुसऱ्या मुलाच्या नावावरून मोठा वादंग सुरु आहे. ‘प्रेन्गेंसी बायबल’ या पुस्तकामध्ये करीनाने दुसऱ्या मुलाचं नावं जहांगीर ठेवल्याचा खुलासा केला आहे. यावरून करिनाला बरचं ट्रोल करण्यात आले. काहींनी या नावाला पसंती दिली तर काहींना याला विरोध दर्शवला.

यावर करिनाने ट्रोलर्सना प्रतिउत्तर देत लिहिले की, मी ट्रोकर्सच्या निगेटिव्ह कमेंट्सकडे अजिबात लक्ष देत नाही. मी एक पॉझिटिव्ह व्यक्ती आहे. त्यामुळे मी अशा गोष्टींकडे सरळ दुर्लक्ष करते. तैमुरच्या नावावेळी अशीच परिस्थिती होती. त्यावेळी देखील लोकांनी या नावावर आक्षेप घेतला. या वादानंतर सैफने नाव न बदलण्याचा निर्णय घेतला. पण अद्याप करीना आणि सैफने आपल्या दुसऱ्या मुलाचे नाव अधिकृतपणे जाहीर केले नाही.