घरमनोरंजन'आदिपुरुष'च्या प्रमोशनला सैफ अली खान राहणार अनुपस्थित; 'या' कारणामुळे घेतला निर्णय

‘आदिपुरुष’च्या प्रमोशनला सैफ अली खान राहणार अनुपस्थित; ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय

Subscribe

साऊथ अभिनेता प्रभास, कृती सेनन आणि सैफ अली खान यांचा आगामी बहुचर्चित चित्रपट ‘आदिपुरुष’ बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. ‘रामायण’वर आधारित या चित्रपटातील कलाकारांच्या लूकवरून तर कधी पोस्टरवरून वाद होत आहेत. मात्र, या सर्व अडचणींना सामोरे जात ‘आदिपुरुष’ 16 जूनला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभास भगवान श्रीरामाची भूमिका साकारणार आहे, तर अभिनेता सैफ अली खान रावणाची भूमिका साकारणार आहे. सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरु आहे. या चित्रपटाची टीम अनेक ठिकाणी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावताना दिसत आहे. नुकत्याच समोर आलेल्या बातमीनुसार, सैफ अली खान ‘आदिपुरुष’च्या प्रमोशनमध्ये सहभागी होऊ शकणार नाही.

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खान ‘आदिपुरुष’च्या प्रमोशनमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. कारण सध्या सैफ अली खान त्याच्या कुटुंबासोबत परदेशात फॅमिली ट्रीपवर आहे.

- Advertisement -

या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

प्रभास आणि कृति सेनन यांचा ‘आदिपुरुष’ चित्रपट 16 जून 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यात देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत दिसेल तर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसेल. ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली-2’ सारख्या चित्रपटानंतर प्रभासला या अवतारात पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे.

 

- Advertisement -

हेही वाचा :

‘परिनिर्वाण’मधून उलगडणार नामदेव व्हटकर यांच्या आयुष्यातील संघर्षमय प्रवास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -