घरताज्या घडामोडीKareena Kapoor सोबत लग्न करण्याआधी Saif ने लिहीलं होतं Amrita Singhला पत्र!...

Kareena Kapoor सोबत लग्न करण्याआधी Saif ने लिहीलं होतं Amrita Singhला पत्र! केला होता मोठा खुलासा, वाचा

Subscribe

लग्नावेळी अमृता 33 तर सैफ 21 वर्षांचा होता. त्यावेळीस अमृता बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री होती. तर सैफचा सिनेसृष्टीशी काही संबंध नव्हता.

अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan)  आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंह (Amrita Singh)  यांची लव्हस्टोरी बॉलिवूडमधील चांगलीच चर्चीत स्टोरी आहे. दोघे आज जरी एकत्र नसले तरी त्यांचे किस्से आणि कहाण्या आजही ऐकायला मिळतात. सैफ आणि अमृताने 1991 मध्ये लग्न केले. त्यांचे लग्न चर्चेत येण्याचे एकच कारण होते ते म्हणजे त्यांच्या वयातील अंतर. अमृता सिंह सैफपेक्षा 12 वर्षांनी मोठी होती. लग्नावेळी अमृता 33 तर सैफ 21 वर्षांचा होता. त्यावेळीस अमृता बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री होती. तर सैफचा सिनेसृष्टीशी काही संबंध नव्हता. लग्नानंतर अमृता आणि सैफ दोन मुलांचे पालक झाले. सारा आणि इब्राहिम अली खान अशी दोन मुले त्यांना झाली.

- Advertisement -

लग्नानंतर सैफ आणि अमृतामध्ये सर्वकाही ठिकठाक सुरू होते. मात्र त्यानंतर काही दिवसात दोघांमध्ये खटके उडण्यास सुरूवात झाली. मीडिया रिपोर्टनुसार, अमृताचे सैफ आणि त्याच्या कुटुंबियांशी पटत नव्हते. दोघांमध्ये सतत वाद होऊन 2004मध्ये लग्नाच्या 13 वर्षांनी दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

अमृता सिंहसोबत नाते मोडल्यानंतर जवळपास 7-8 वर्षांनी सैफच्या आयुष्यात करिना आली आणि त्यांनी 2012मध्ये लग्न केले. सैफ आणि अमृताच्या लग्नात करिना केवळ 10 वर्षांची होती. करिना मोठी होऊन सैफसोबत लग्न करेल असे कोणालाही वाटले नव्हते. करिनाशी लग्न करण्याआधी सैफने अमृता सिंहला एक पत्र लिहिले होते. या पत्रात सैफने अमृताला तिच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. तुझ्यासोबत घालवलेले क्षण माझ्यासोबत कायम असून मी आता करिनाशी लग्न करत असल्याचे अमृताला सांगितले होते.


हेही वाचा – Alka Kubal Daughter Wedding: अलक कुबल यांची ‘पायलट’ लेक चाचली सासरला, पाहा इशानीच्या लग्नाचे फोटो

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -