घरताज्या घडामोडीपरिणीती की सायना नेहवाल ओळखणंही झालं कठीण

परिणीती की सायना नेहवाल ओळखणंही झालं कठीण

Subscribe

परिणीतीची ह लुक डिट्टो सायना नेहवालच्या लुकशी मिळता जुळता आहे.

बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या जिवानावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमा फर्स्ट लुक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉलिवुड अभिनेत्री परिणीती चोप्रा या सिनेमात सायना नेहवालची भुमिका साकारणार आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या याच सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.

अभिनेत्री परिणीतीचा सायना नेहवालच्या भुमिकेतला तिचा लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे. परिणीती चोप्रा फॅन क्लब या पेज वरून तिचा हा फोटो शेअर करण्यात आला आहे. यात तिने भुमिकेसाठी घेतलेली मेहनत दिसून येत आहे. तिचा हा लुक डिट्टो सायना नेहवालच्या लुकशी मिळता जुळता आहे. खुद्द सायना नेहवालनेही हा फोटो तिच्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे.

- Advertisement -

परिणीतीच्या या फोटोमुळे तिचे आणि सायनाचे चाहतेही चकीत झाले आहेत. परिणीती चोप्रा सायना नेहवालची डिट्टो ड्युपलिकेट आहे असं चाहते म्हणत आहेत. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहत्यांनी परिणीतीचं खुप कौतुक केलं आहे. तिच्या फोटोवर कमेंटचा पाऊस पडला आहे.

- Advertisement -

‘ही भुमिका खरंच खूप आव्हानात्मक आहे असं मी मानते. कारण चॅम्पियन बनणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी भरपूर मेहनत आणि कठोर परिश्रम घ्यावे लागतात’, असं परिणीती चोप्रानं एका मुलाखतीत सांगितलं होतं.

सायना नेहवालच्या या बायोपिकसाठी आधी अभिनेत्री श्रद्धा कपूरला घेण्यात आलं होतं. श्रद्धानं या सिनेमासाठी शुटींगही केलं होत पण तिने हे शुटींग अर्ध्यातच सोडून दिलं. त्यानंतर अभिनेत्री परिणीती चोप्राला या भुमिकेसाठी घेण्यात आलं. सिनेमासाठी परिणीतीने घेतलेल्या मेहनतीचा अंदाज सिनेमाच्या पहिल्या लुक मधून समोर आला आहे. त्यामुळे सायना नेहवालच्या या बायोपिक बद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे.


हेही वाचा – Karwa chauth 2020: विमानातून चंद्र पाहता यावा म्हणून श्रीदेवीने पायलटकडे केली होती ‘ही’ मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -