घरमनोरंजनश्रद्धा कपूरनं बायोपिकसाठी अधिक तयारी करण्याची सायनाची इच्छा

श्रद्धा कपूरनं बायोपिकसाठी अधिक तयारी करण्याची सायनाची इच्छा

Subscribe

सायनाच्या बायोपिकमध्ये आपला अभिनय उत्तम व्हावा यासाठी श्रद्धा भरपूर मेहनत घेत आहे. मात्र तरीही श्रद्धानं याची जास्त गंभीरता समजून घ्यावी अशी सायना नेहवालची इच्छा आहे.

बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालच्या बायोपिकची घोषणा तर मागच्या वर्षीच करण्यात आली होती. मात्र दिग्दर्शक अमोल गुप्ताच्या या चित्रपटाचं चित्रीकरण पुढे होतच नसल्याची सध्याची स्थिती आहे. या चित्रपटात सायनाची भूमिका श्रद्धा कपूर साकारणार असून बऱ्याच महिन्यांपासून बॅडमिंटनचा ती कसून सराव करत आहे. या चित्रपटात आपला अभिनय उत्तम व्हावा यासाठी श्रद्धा भरपूर मेहनत घेत आहे. मात्र तरीही श्रद्धानं याची जास्त गंभीरता समजून घ्यावी अशी सायना नेहवालची इच्छा असल्याच्या बातमीनं सध्या जोर धरला आहे.

श्रद्धानं भूमिका समजावी अशी सायनची इच्छा

मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धानं आपली भूमिका अतिशय गंभीरतेनं साकारावी अशी सायनाची इच्छा आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु होण्यापूर्वी श्रद्धानं तिला संपूर्ण समजून घ्यावं असं सायनाला वाटत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवासांपर्यंत श्रद्धाला या खेळाबद्दलही काही माहीत नव्हतं. मात्र पद्मभूषण पुरस्कार विजेती सायना आणि श्रद्धा नेहमीच एकमेकींच्या संपर्कात आहेत. टीमला लागणारी सर्व मदत सायना करत आहे. दरम्यान श्रद्धा आपली भूमिका साकारण्यास योग्य तऱ्हेनं तयार होईल तेव्हा सायना चित्रीकरणाला परवानगी देईल अशीदेखील माहिती सध्या सूत्रांकडून मिळत आहे. यावर श्रद्धाची मात्र कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

- Advertisement -

श्रद्धाकडे सध्या वेळ नाही

श्रद्धा आपल्या कामासंदर्भात अतिशय गंभीर असते. ती गेले २२ दिवस सतत चित्रीकरणात व्यस्त असल्यामुळं तिला बॅडमिंटनच्या सरावासाठी वेळ मिळत नसल्याची माहिती आहे. नुकतंच एका चित्रपटाच्या लाँचिंग दरम्यान श्रद्धाला बायोपिक संदर्भात प्रश्न केले असता तिनं काहीही बोलण्यास नकार दिला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -