Saira Banu Hospitalized: जेष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांची तब्येत बिघडल्याने ICU मध्ये उपचार सुरू

saira banu
जेष्ठ अभिनेत्री सायरा बानो

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्यासोबत ५४ वर्षांपासून एकत्र राहणाऱ्या अभिनेत्री सायरा बानो यांना आता श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आहे. दिलीप कुमार यांचे निधन होऊन दोन महिने झाले आहेत. परंतु त्यांच्या मृत्यूच्या दुःखातून अजून त्यांच्या पत्नी सायरा बानू काही सावरू शकल्या नाही आहेत. याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर खूप होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील हिंदुजा रुग्णालयातील ICUमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे. (saira banu hospitalised in hinduja hospital)

माहितीनुसार, सायरा बानो यांची प्रकृती स्थिर आहे. परंतु त्यांचा बीपी काही नॉर्मल होत नाही आहे. त्यांची ऑक्सिजन लेव्हल लो असून यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यामुळे अजूनही तीन ते चार दिवस त्यांना रुग्णालयात राहावे लागणार आहे.

कुटुंबियांतील निकटवर्तीय म्हणाले की, सायरा बानो अजूनही दिलीप कुमार यांच्या जाण्याच्या दुःखात आहेत. त्या ना कोणाशी काही बोलतात, ना कोणाला भेटतात. संपूर्ण जगाला विसरून त्यांनी दिलीप कुमार यांच्या आठवणींना आपले संपूर्ण जग बनवले आहे. सायरा बानो यांच्यासाठी दिलीप कुमार आयुष्य होते. ५४ वर्षांपासून त्यांनी दिलीप कुमार यांची काळजी घेण्यासाठी स्वतःला व्यस्त केले होते.

सायरा बानो ७६ वर्षांच्या आहेत. जेव्हा सायरा बानो २२ वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत लग्न केले होते. पण दिलीप कुमार यांच्या मृत्यूनंतर सायरा बानो यांची काळजी कशी घ्यावी? हे त्यांच्या कुटुंबियांना समजत नाही आहे.


हेही वाचा – महात्मा गांधी बदनामी प्रकरण, अभिनेत्री पायल रोहतगीवर पुण्यात गुन्हा दाखल