घरताज्या घडामोडीNational Awards 2021: साजिद नाडियाडवालाने नॅशनल ॲवार्ड सुशांतला केला समर्पित

National Awards 2021: साजिद नाडियाडवालाने नॅशनल ॲवार्ड सुशांतला केला समर्पित

Subscribe

राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा (National Awards 2021) आज, सोमवारी पार पडला. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या ‘छिछोरे’ चित्रपटाला सर्वोकृष्ट हिंदी चित्रपटचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार निर्माता साजिद नाडियाडवालाने सुशांत सिंग राजपूतला समर्पित केला आहे. त्यामुळे सध्या साजिद नाडियाडवालाचे कौतुक केले जात आहे. (Sajid Nadiadwala dedicates his National award to Sushant Singh Rajput)

‘छिछोरे’ या चित्रपटात सुशांत व्यतिरिक्त वरुण शर्मा आणि श्रद्धा कपूर देखील आहे. चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे संपूर्ण चित्रपटाची टीम खूप खुश आहे. यानिमित्ताने निर्माता साजिद नाडियाडवालने सुशांत सिंग राजपूतचे स्मरण करून चित्रपटाला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार सुशांतला समर्पित केला आहे. याबाबत साजिदच्या प्रोडक्शन हाऊसने अधिकृत ट्वीटवर हँडवर एका पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये साजिद आणि सुशांतचा फोटो आहे.

- Advertisement -

हे ट्वीट करत साजिदच्या प्रोडक्शन हाऊसने लिहिले आहे की, ‘एनजीईमधील आमच्या सर्वांसाठी आज अभिमानाचा दिवस आहे. कारण आम्हाला छिछोरेसाठी प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. धन्यवाद नितेश तिवारी या खास चित्रपटासाठी. हा पुरस्कार आम्ही सुशांत सिंग राजपूतला समर्पित करतो.’

- Advertisement -

येणाऱ्या दिवसांत नाडियाडवाले निर्मित अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ‘तडप’, अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’, रणवीर सिंगचा ‘८३’ आणि टायगर श्रॉफचा ‘हिरोपंती २’सह अनेक नाडियाडवाला निर्मित चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.


हेही वाचा – 67th National Film Awards : रजनीकांत ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मानित, धनुष, मनोज बाजपेयी, कंगनाचाही गौरव


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -