घरताज्या घडामोडीवडिलांच्या आठवणीत ही मराठी अभिनेत्री झाली भावूक; म्हणाली... काही हात निसटले!

वडिलांच्या आठवणीत ही मराठी अभिनेत्री झाली भावूक; म्हणाली… काही हात निसटले!

Subscribe

काही आठवणी चेहऱ्यावर हसू उमटवतात तर काही डोळ्यांत पाणी आणतात. काही आठवणी आपण मनाच्या कोपऱ्यात खूप जपून ठेवतो. कारण त्या आठवणींशी निगडीत असलेली व्यक्ती आपल्या खूप जवळची असते. अशीच पोस्ट ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री सखी गोखले हिनं इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. सखीनं तिच्या बाबांसाठी लिहिलेली ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सखीनं तिचे बाबा म्हणजेच दिवंगत अभिनेते मोहन गोखले यांच्यासाठी ही भावुक पोस्ट लिहिली आहे.

- Advertisement -

सखीनं शाळेच्या दिवसांतला एक फोटो शेअर केलाय. शाळेच्या गणवेशात बससाठी वाट पाहणारी सखी बाबा आणि आईसोबत उभी असल्याचं या फोटोत पाहायला मिळतंय.

‘हिच ती जागा आहे… जिथं माझ्या शाळेची बस मला न्यायला आणि सोडायला यायची. शाळेत जाताना निरोप देणारे आणि नंतर मी येण्याची आतुरतेने वाट पाहणारे हात मी याच ठिकाणी धरले. काही नाजूक तर काही कणखर अशा हातांमध्ये माझे हात होते. काही हातांना माझे हे छोटे हात पकडता आले नाहीत. काही हात निसटले, तर काही सापडले’, अशा आशयाची पोस्ट सखीनं शेअर केली आहे.

View this post on Instagram

Splendour breeze on a hot summer afternoon ?

A post shared by Sakhi Gokhale (@sakheeg) on

- Advertisement -

‘मिस्टर योगी’ मालिकेपासून घराघरांत पोहोचलेल्या मोहन गोखलेंनी ‘हिरो हिरालाल’,’ मोहन जोशी हाजीर हो’ यांसारख्या अनेक सिनेमांत अजरामर भूमिका केल्या. मात्र, वयाच्या अवघ्या ४५व्या वर्षी त्यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. सखी गोखले ही मोहन गोखले व शुभांगी गोखले यांची कन्या आहे.


हे ही वाचा – सावधान! कोरोनापेक्षा मोठी ५ संकटं पृथ्वीवर येणार आहेत, नासाने दिले संकेत!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -