HomeमनोरंजनSalman Khan : प्रेम पुन्हा येतोय? प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिले सलमानच्या नव्या सिनेमाचे...

Salman Khan : प्रेम पुन्हा येतोय? प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिले सलमानच्या नव्या सिनेमाचे अपडेट

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या आगामी सिनेमा ‘सिकंदर’मूळे प्रचंड चर्चेत आहे. अशातच त्याचा आणखी एक सिनेमा आपल्या भेटीस येण्यासाठी सज्ज होतोय, अशी नवी अपडेट समोर आली आहे. याबाबत प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक सूरज बड़जात्या यांनी माहिती दिली आहे. सुरज बड़जात्या आणि सलमान खान ही बॉलिवूड सिनेविश्वातील सुपरहिट सिनेमा देणारी जोडी आहे. सुरज यांनी सलमानच्या ‘प्रेम’ या पात्राला जन्म दिला होता. त्यामुळे या नव्या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेम प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे. याबाबत सुरज बड़जात्या काय म्हणाले ते जाणून घेऊया. (Salman Khan and Sooraj Barjatya are making a new movie)

सलमानच्या नव्या सिनेमाचे अपडेट 

बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान त्याच्या आगामी ‘सिकंदर’ सिनेमात व्यस्त आहे. या सिनेमाचे शूटिंग अंतिम टप्प्यात असून या वर्षातील ईदच्या निमित्ताने हा सिनेमा प्रदर्शित करण्याची तयारी सुरु आहे. या सिनेमानंतर क्षणाचीही उसंत न घेता सलमान लगेच दुसऱ्या प्रोजेक्टकडे वळणार आहे. फिल्ममेकर सूरज बड़जात्या यांनी सलमान खानसोबत नवा सिनेमा बनवत असल्याचे अपडेट दिले आहेत.

नव्या ‘प्रेम’ची भेट होणार

सुरज बडजात्या यांनी अभिनेता सलमान खानच्या ‘प्रेम’ या पात्रास उदयाला आणले. सलमानने साकारलेल्या प्रेमला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रेम मिळालं. यानंतर आता सुरज पुन्हा एकदा सलमानच्या जुन्या पात्राला नव्याने प्रेक्षकांसमोर आणणार आहे. याबाबत बोलताना सूरज यांनी म्हटले, ‘तुमचा प्रेम आता त्या वयात राहिलेला नाही. त्यामुळे आता नव्या प्रेमच्या भेटीसाठी तयार व्हा’. माहितीनुसार, सध्या सुरज या आगामी सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम करत आहेत आणि लवकरच सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनला सुरुवात केली जाईल.

काय म्हणाले सुरज बडजात्या?

सुरज बडजात्या यांनी आगामी सिनेमाचे अपडेट देताना सांगितले, ‘होय. मी सलमानसोबत नवी फिल्म बनवतोय. पण त्यासाठी मला थोडा वेळ लागेल. कारण आता आपल्याला हे मान्य करावे लागेल की त्याचे वय झाले आहे. ज्यामुळे मला नवा प्रेम बनवावा लागणार आहे. जो त्याला त्याच्या वयाप्रमाणे साजेसा असेल. तो आतापर्यंत जे करत आला आहे तो आताच्या वयातही तसाच काहीतरी करेल, अशा अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. त्यामुळे त्याच्या वयाला शोभेल असा प्रेम तयार करण्यासाठी मला वेळ हवा आहे. जेणेकरून मी असा प्रेम तयार करेन ज्यामध्ये मजा, मस्ती आणि तेच जुने गुण असतील जे प्रेक्षकांना भावले होते’.

सलमान खान आणि सूरज बडजात्या पुन्हा एकत्र

माहितीनुसार, सलमान खान आणि सुरज बडजात्या यांनी एकत्र जवळपास 4 सिनेमे केले आहेत. जे बॉक्स ऑफिसवर कमाल हिट झाले होते. सलमान आणि सूरज यांनी एकत्र सिनेविश्वातील करिअरला सुरुवात केली होती. 1989 मध्ये प्रदर्शित झालेला ‘मैंने प्यार किया’ हा सिनेमा सलमानच्या करिअरमधला टर्निंग पॉईंट होता. ज्याचे दिग्दर्शन सुरज बडजात्या यांनी केले होते. त्यानंतर या जोडीने 1994 मध्ये ‘हम आपके हैं कौन’ सिनेमासाठी एकत्र काम केले. या सिनेमाचं क्रेझ आजही कायम आहे.

पुढे 1999 मध्ये मल्टी स्टारर सिनेमा ‘हम साथ साथ है’साठी या जोडीने पुन्हा एकत्र काम केले आणि आणखी एक सुपरहिट सिनेमा दिला. या सिनेमानंतर तब्बल 16 वर्षांनी ते 2015 मध्ये ‘प्रेम रतन धन पायो’ सिनेमासाठी एकत्र आले होते. या चारही सिनेमात सलमानच्या पात्राचे नाव ‘प्रेम’ असे होते. आतापर्यंत या जोडीने जेव्हढे सिनेमे एकत्र केले सगळे सुपरहिट झाले. त्यामुळे आता त्यांचा आगामी सिनेमा सुद्धा तितकाच सुपरहिट होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही पहा –

Saif Ali Khan : जखमी सैफ गाडीऐवजी रिक्षातून रुग्णालयात का गेला?