HomeमनोरंजनSalman Khan Birthday : 59 व्या वर्षातही हँडसम हंक आहे 'दबंग भाईजान'

Salman Khan Birthday : 59 व्या वर्षातही हँडसम हंक आहे ‘दबंग भाईजान’

Subscribe

केवळ बॉलिवूडच नव्हे, तर संपूर्ण देशाचा भाईजान असलेल्या सलमान खानचा आज वाढदिवस. 27 डिसेंबर 2024 रोजी सलमान खान त्याचा 59 वा वाढदिवस साजरा करतोय. त्याचा वाढदिवस हा त्याच्यापेक्षाही जास्त त्याच्या चाहत्यांसाठी विशेष असतो. 27 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासूनच सलमान खानच्या वाढदिवसाचं धमाकेदार सेलिब्रेशन सुरू झालं आहे. यासंबंधीचे अनेक फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

सलमान खान त्याच्या अभिनयासाठी, त्याच्या अॅक्शन सीन्ससाठी जसा ओळखला जातो तसाच तो त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो. फिटनेसच्या बाबतीत या वयात लहान मुलांनाही मागे टाकणारा सलमान खान आपल्या आहाराची विशेष काळजी घेतो आणि जिममध्येही खूप घाम गाळतो. जाणून घेऊया सलमान खानच्या फिटनेसचे रहस्य.

सलमान खान डाएट आणि वर्कआउट फिटनेस:

सलमान खान वयाच्या 59 व्या वर्षीही त्याच्या फिटनेस आणि पिळदार शरीरासाठी प्रसिद्ध आहे, त्याच्या कठोर वर्कआउट रूटीनमुळे आणि संतुलित आहारामुळे तो या वयातही तंदुरुस्त राहतो. बॉलीवूडचा दबंग खान या वयात त्याच्या मस्क्युलर बॉडीने आणि मजबूत ऍब्सने तरुण कलाकारांनाही टक्कर देतो. तो बहुतेक लोकांसाठी फिटनेसचा आदर्श राहिला आहे. आजही फिटनेसकडे लक्ष देणाऱ्या मुलांना सलमान खानसारखी बॉडी हवी असते. पण या वयातही फिटनेस कायम ठेवण्यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली आहे. जिममध्येही तो खूप घाम गाळतो.

वर्कआउट रूटीन:

सलमान खान आठवड्यातून 6 दिवस वर्कआउट करतो, ज्यामध्ये तो मसल्स ट्रेनिंगवर अधिक भर देतो. तो व्यायामशाळेत वेगवेगळे व्यायाम करतो. सलमान आठवड्यातून काही दिवस पायांच्या व्यायामासाठी देतो. याशिवाय वेट ट्रेनिंग, कार्डिओ आणि इतर व्यायाम देखील करतो.

Salman Khan Birthday: 'Dabang Bhaijaan' still has handsome hunk at 59

सलमान खान कोणता व्यायाम करतो?

वेट ट्रेनिंग:

स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी बेंच प्रेस, स्क्वॅट्स, डेडलिफ्ट्स आणि बायसेप कर्ल्स यासारख्या व्यायामांचा समावेश आहे.

कार्डिओ एक्सरसाइज :

हृदयाच्या आरोग्यासाठी आणि चरबी जाळण्यासाठी कार्डिओ व्यायामामध्ये धावणे, सायकल चालवणे आणि पोहणे यासारख्या व्यायामाला प्राधान्य देतो.

फंक्शनल एक्सरसाइज :

पुश अप्स, पुल अप्स यासारख्या एक्सरसाइज करुन तो ओव्हरऑल फिटनेस कायम ठेवतो.

डाएट प्लान :

सलमान खान आपल्या आहारात प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि हेल्दी फॅट्स या सर्व पदार्थांचे संतुलन राखतो. सलमान खान नाश्त्यात लो फॅट दूध आणि प्रोटीन शेक घेतो.

दुपारच्या जेवणात सलमान डाळ, रोटी, भात, कोशिंबीर आणि मटण किंवा तळलेले मासे खातो. याशिवाय संध्याकाळच्या स्नॅकमध्ये सफरचंद आणि ड्रायफ्रूट्स खाण्यावर भर देतो.

प्रोटीनचे प्रमाण लक्षात घेऊन सलमान संतुलित आणि पौष्टिक आहार घेतो. रात्रीच्या जेवणात तो चिकन, भात आणि सॅलड खातो. तसेच झोपण्यापूर्वी लो फॅट मिल्क प्रोटिन पितो.

सलमान खानला भारतीय आणि घरी बनवलेले पदार्थ आवडतात, ज्यात विशेषतः त्याच्या आईने बनवलेल्या बिर्याणीचा समावेश होतो. त्याच्या फिटनेसचे रहस्य नियमित वर्कआउट्स, संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीमध्ये आहे, जे त्याला या वयातही तंदुरुस्त आणि सक्रिय ठेवते.

हेही वाचा : Interview Preparation : अशी करा तयारी व्हर्च्युअल इंटरव्ह्यूची


Edited By – Tanvi Gundaye