घरताज्या घडामोडीभाईजानच्या बर्थ डे दिवशी पोलिसांकडून चाहत्यांवर लाठीचार्ज, व्हिडीओ व्हायरल

भाईजानच्या बर्थ डे दिवशी पोलिसांकडून चाहत्यांवर लाठीचार्ज, व्हिडीओ व्हायरल

Subscribe

बॉलिवूडचा दबंग आणि भाईजान सलमान खानचा आज वाढदिवस. सलमान खान ५७ वर्षांचा झाला. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याने बांद्रा येथील घरी पार्टीचे आयोजन केले होते. त्यामुळे त्याला शुभेच्छा देण्यासाठी अनेक कलाकार पोहोचले होते. त्याच्या वाढदिवसाला सलमानच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. मात्र, भाईजानच्या बर्थ डेदिवशी एक धक्कादायक प्रकार घडला. तो म्हणजे चाहत्यांनी केक खाण्याऐवजी पोलिसांच्या लाठ्या खाल्या आहेत. यावेळी सलमानच्या घरासमोर राडा झाल्याचं पाहायला मिळालं.

सलमानच्या बर्थ डेदिवशी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर चाहत्यांनी हजेरी लावली होती. सलमानचे घर मुख्य रस्त्यावर असल्यामुळे चाहत्यांनी रस्त्यावर एकच गर्दी केली होती. या गर्दीला आटोक्यात आणणं पोलिसांसाठी कठीण झालं होतं. त्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्जला सुरूवात करण्यात आली. या घटनेचा एक व्हिडीओ सुद्धा समोर आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

- Advertisement -

सलमान खानने आयोजित केलेल्या पार्टीत शाहरुख खान, अरबाज खान, सोहेल खान, अर्पिता खान, आयुष शर्मा, अतुल अग्निहोत्री, तब्बू, संगीता बिजलानी, सोनाक्षी सिन्हा, सिद्धांत चतुर्वेदी, कार्तिक आर्यन, जिनिलिया देशमुख, रितेश देशमुख, पुलकित सम्राट, कृती खरबंदा, पूजा हेगडे यांच्यासह अनेक सिनेसृष्टीतील कलाकारांनी उपस्थिती लावली होती.

- Advertisement -

हेही वाचा : ‘गांधी-गोडसे एक युद्ध’मध्ये मराठमोळा अभिनेता साकारणार नथुराम गोडसेंची भूमिका


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -