सलमान खानला पनवेलच्या फार्म हाऊसवर सर्पदंश ; बिनविषारी सापामुळे अनर्थ टळला

bombay high court grants relief to salman khan adjourned andheri magistrate court summons till may 5
पत्रकार धमकी प्रकरणी Salman Khan ला दिलासा; अंधेरी दंडाधिकारी कोर्टाच्या समन्सला 5 मेपर्यंत स्थगिती

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याला सर्पदंश झाला आहे.पनवेलच्या फार्महाऊसवरील ही काल रात्रीची घटना असून,साप बिनविषारी असल्यामुळे अनर्थ टळला आहे.सलमान खान याचे फार्म हाऊस पनवेलमधील नेरे या ग्रामीण भागात आहेत. सलमान खान हा आपल्या पनवेलच्या फार्महाऊसवर अनेकदा जात असतो.ख्रिसमस या सणानिमित्त सलमान खान हा त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर आला होता. २५ डिसेंबरच्या रात्री तो बाहेर फिरण्यासाठी आला असताना त्याच्या पायाला रात्री २ ते ३ च्या सुमारास साप चावला आहे.त्यानंतर सलमान खान याला तातडीने कामोठे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यानंतर त्याच्यावर सकाळी नऊ वाजेपर्यंत उपचार करण्यात आले. मात्र हा साप बिनविषारी असल्यामुळे सलमान खान हा प्रसंग त्याच्या जीवावर बेतला नाही.त्यामुळे त्याची प्रकृती ठिक असल्याचे कामोठे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे.त्यानंतर सलमानला डिस्चार्ज दिला असून,तो पुन्हा त्याच्या पनवेलमधील फार्महाऊसवर पोहचला आहे.कामोठे हे रुग्णालय सलमान खानच्या फार्महाऊसवरुन जवळपास पाऊणतास इतके लांब असून, निव्वळ साप बिनविषारी असल्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. त्यामुळे सलमान खानच्या चाहत्यांचाही जीव भांड्यात पडला आहे.

पनवेलमधील हे फार्म हाऊस माथेरानच्या डोंगररांगांच्या मागील बाजूस नेरे या परिसरात आहे.सलमान खान दरवेळेस या फार्म हाऊसला भेट देत असून, या भल्या मोठ्या जागेत तो नेहमी शेती करताना,ट्रॅक्टर चालवतानाच्या व्हिडिओ आपल्यासमोर येत असतात.


हे ही वाचा – रोहिणी खडसेंकडून जीवाला धोका, शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटलांचा आरोप