Salman Khan ने सेलिब्रेट केला वडिल सलीम खान यांचा ८६वा वाढदिवस

सलमानने त्याच्या सोशल मीडियावरुन 'हॅपी बर्थ डे डॅड' असे म्हणत फॅमिली फोटो शेअर केला.

salman khan celebrates father salim khan's 86th birthday with family
Salman Khan ने सेलिब्रेट केला वडिल सलीम खान यांचा ८६वा वाढदिवस

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे वडिल ‘सलीम खान’ यांचा ८६वा वाढदिवस भाईजान सलमान खानने संपूर्ण फॅमिलीसोबत साजरा केला. सलमानचे संपूर्ण फॅमिली यावेळी तिथे उपस्थित होते. सलमानने फॅमिलीसोबतचा फोटो देखील शेअर केला आहे. मध्यरात्री सलमान आणि त्याच्या फॅमिलीने वडिलांना वाढदिवसाचे सप्राइज दिले. रात्री सलमानने त्याच्या सोशल मीडियावरुन ‘हॅपी बर्थ डे डॅड’ असे म्हणत फॅमिली फोटो शेअर केला. या फोटोंमध्ये संपूर्ण फॅमिली एकत्र पहायला मिळत आहे. सलमानच्या या पोस्टनंतर त्याच्या फॅन्सनी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमान खानने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याचे दोन्ही भाऊ, दोन्ही बहिणी, भाची- भाचा, वडिल सलीम खान आणि त्यांच्या दोन्ही पत्नी दिसत आहेत. सलीम खान सोफ्यावर बसले आहेत. त्यांच्या बाजूला त्यांची पहिली पत्नी सलमा खान बसल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुलगा अभिनेता अरबाज खान बसला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या मागे सोहेल खान, बहिण अलवीरा, हेलन आणि अर्पिता दिसत आहेत. सलमान खान त्याची भाची आयतला हातात घेऊन उभा आहे. आयत सलमानचे केस ओढताना दिसत आहे. एक परफेक्ट फॅमिली फोटो पाहून चाहते देखील आनंदी झालेत. सलमानच्या फॅमिलीमधील सदस्य एकमेकांवर खूप प्रेम करतात हे या फोटोतून दिसून आले आहे.

सलमान खानने या आधी देखील ‘फादर्स डे’ च्या निमित्ताने वडिलांसोबत फोटो शेअर केला होता. सलमान सध्या ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात समानची बहिण अर्पिताचा नवरा आयुष शर्मा देखील दिसणार आहे. पहिल्यांदा भावोजी आणि मेहूणा एकत्र काम करणार आहेत.


हेही वाचा – Rakhi Sawant Birthday: कधी बॉयफ्रेंडला थप्पड तर कधी रचलं स्वयंवर, जाणून घ्या राखीच्या अफेयर्सची कहाणी