Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'जीने के हैं चार दिन' गाण्यावर भाईजानने चाहत्यांसोबत केला धमाकेदार डान्स

‘जीने के हैं चार दिन’ गाण्यावर भाईजानने चाहत्यांसोबत केला धमाकेदार डान्स

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड (Bollywood)अभिनेता सलमान खान (Salman Khan)सध्या ‘टायगर 3′(Tiger3) या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तुर्कीमध्ये आहे. रविवारी रात्री शूटिंग संपल्यानंतर त्याने त्याच्या काही चाहत्यांसोबत जोरदार पार्टी केली. या पार्टीचा व्हिडिओ सलमान खानच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये सलमान त्याच्या चाहत्यांसोबत आणि मित्रांसोबत ‘जीने के है चार दिन’ या गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.(Salman Khan Dancing To Jeene Ke Hain Chaar Din In Turkey)

व्हिडिओमध्ये  दिसतेय कीसलमानसोबत त्याचे चाहते दंगा करत  नाचत आहेत. या पार्टीत सलमानने निळ्या रंगाचा शर्ट, निळी पँट, काळ्या रंगाचे लेदरचे जाकीट आणि बेरेट परिधान केला आहे. या दरम्यान, त्याने प्रसिद्ध टॉवेल-टू-द-क्रॉच डान्स स्टेप देखील केले. आजूबाजूच्या लोकांनी त्याच्यासाठी शिट्ट्या वाजवल्या आणि जल्लोष केला. या व्हिडिओवर सलमानचे चाहत्यांची तूफान प्रतिक्रिया येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Syed Maqdhoom (@maqdoom_salman_)

- Advertisement -

सलमान आणि कॅटरीना सध्या टायगर 3 चे शूटिंग तुर्कीमध्ये करत आहेत. इम्रान हाश्मी देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यासाठी त्याने रशियातील काही भागांचे शूटिंग आधीच पूर्ण केले आहे. तो पुढील शूटींगसाठी ऑस्ट्रियाला जाणार आहे. चित्रपटात सलमान रिसर्च अँड अॅनालिसिस विंग एजंट टायगर म्हणून परतणार आहे, तर कॅटरीना पाकिस्तानी गुप्तचर एजंट झोयाची भूमिका साकारणार आहे.यासोबतच सलमान लवकरच बिग बॉस 15 होस्ट करणार आहे. त्याचे बरेच प्रोमो सोशल मीडियावरही आले आहेत. सध्या, शोचा डिजिटल स्पिन-ऑफ, बिग बॉस ओटीटी वूट अॅपवर प्रसारित केला जात आहे. करण जोहर हा शो होस्ट करत आहे


- Advertisement -

हे हि वाचा- The Incarnation Sita : मध्ये कंगना साकारणार सीतेची भूमिका

- Advertisement -