Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी चिरंजीवीच्या Godfatherमध्ये सलमानची एंट्री, पहिल्यांदाच करणार दाक्षिणात्य सिनेमात काम

चिरंजीवीच्या Godfatherमध्ये सलमानची एंट्री, पहिल्यांदाच करणार दाक्षिणात्य सिनेमात काम

Subscribe

सलमानने आजवर अनेक तमिळ आणि तेलुगू सिनेमांच्या हिंदी रिमेकमध्ये काम केलं होतं. मात्र सलमान पहिल्यांदा ओरिजीनल तेलुगू सिनेमात काम करणार आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आता दाक्षणित्य सिनेमात एंट्री करणार आहे. अनेक वर्ष बॉलिवूडवर आपली छाप पाडून भाईजान सलमान खान आता दाक्षिणात्य सिनेमात दिसणार आहे. साऊथ सुपरस्टार चिरंजीवीच्या अपकमिंग गॉडफादर या तेलुगू सिनेमा सलमान खान काम करणार आहे. सलमानने आजवर अनेक तमिळ आणि तेलुगू सिनेमांच्या हिंदी रिमेकमध्ये काम केलं होतं. मात्र सलमान पहिल्यांदा ओरिजीनल तेलुगू सिनेमात काम करणार आहे.

अभिनेता चिरंजीवीने सलमानचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. दोघांचा फोटोदेखील सोशल मीडियावर चिरंजीवीने शेअर केला आहे. सोबत कॅप्शन देत चिरंजीवीने सलमानवर प्रेमाचा वर्षाव केला. म्हटले, “गॉडफादमध्ये सलमान भाईचं स्वागत आहे. तुझ्या एंट्रीने आमच्यात वेगळीच एनर्जी आलीये. आमची एक्साइटमेंट लेव्हल आणखी वाढली आहे. तुझ्यासोबत स्क्रिन शेअर करणं ही फार आनंदाची गोष्ट आहे. तुझ्या येण्याने प्रेक्षकांना एक जादुयी किक बसेल”.

- Advertisement -

गॉडफादर हा कमर्शल एंटरटेर सिनेमा आहे. मोहन राजा या सिनेमाची डिरेक्शन करत आहे. मल्याळम सिनेमा लुसिफरचा (Lucifer) हा तेलुगू रिमेक आहे. काही दिवसांपूर्वी सलमान चिरंजीवीच्या गॉडफादरमध्ये काम करणार अशा चर्चा रंगल्या होत्या आणि आज चिरंजीवीच्या पोस्टनंतर या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. सलमानचे चाहते देखील त्याच्या साऊथ डेब्यूसाठी आतूर आहेत.

- Advertisement -

मीडिया रिपोर्टनुसार, चिरंजीवीने सलमानला सिनेमात छोटीशी भूमिका करण्याची विनंती केली. चिरंजीवी सलमानला त्याचा खास मित्र मानतो. त्यामुळे सलमान देखील सिनेमात एक छोटी भूमिका करण्यासाठी तयार झाला. असे म्हटले जात आहे की, सिनेमात सलमान तोच रोल करणार आहे जो पृथ्वीराज सुकुमारनने लुसिफरचा (Lucifer) या मल्याळम सिनेमात केला होता. पृथ्वीराजने देखील या सिनेमात छोटी भूमिका साकारली होती.

गॉडफादर हा पॉलिटिकल अँक्शन थ्रिलर सिनेमा आहे. सलमान व्यतिरिक्त सिनेमात नयनतारा, सत्यदेव कंचकण, जय प्रकाश हे कलाकारही आहेत. तर मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्का शेट्टी, राम चरण आणि श्रृती हसन देखील सिनेमात छोटी भूमिका साकारणार आहे. गॉडफादरसह सलमान येत्या काळात पठाण, कभी ईद कभी दिवाली आणि टायगर ३ या सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


हेही वाचा – टायगर श्रॉफच्या ‘Heropanti 2’चा नवा पोस्टर रिलीज

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -