Salman Khanचा शेजाऱ्याविरोधात दाखल केला मानहानीचा खटला, काय आहे प्रकरण?

केतन कक्कड यांनी युट्यूबवरील एका मुलाखतीत माझ्याविषयी अपमानकारक शब्द उच्चारून मला त्रास देण्याचा प्रयत्न केला. ही मुलाखत त्यांनी फेसबुक, ट्विटरसाख्या सोशल मीडिया साइट्सवर देखील अपलोड केला.

Salman Khan files defamation case against neighbor
Salman Khan files defamation case against neighbor

बॉलिवूड स्टार सलमान खानने (Salman Khan ) त्याच्या शेजाऱ्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. सलमानच्या शेजाऱ्याने एका यूट्यूब मुलाखतीत सलमानविषयी अपमानजनक शब्द वापरल्याने सलमानने हा खटला दाखल केला आहे. सलमान आणि त्याचा शेजारी केतन कक्कड हे मुंबईतही वांद्रे येथे एकाच ठिकाणी राहत असून ते शेजारी आहेत. मुंबईतच नाही तर सलमानच्या पनवेल येथील फार्म हाउस शेजारी देखील कक्कड यांची एक जमीन आहे. त्यामुळे दोघेही मुंबईसह पनवेलमध्येही एकमेकांचे सख्खे शेजारी आहेत.

सलमानने मानहानीच्या खटल्यात म्हटले आहे की, केतन कक्कड यांनी युट्यूबवरील एका मुलाखतीत माझ्याविषयी अपमानकारक शब्द उच्चारून मला त्रास देण्याचा प्रयत्न केला. ही मुलाखत त्यांनी फेसबुक, ट्विटरसाख्या सोशल मीडिया साइट्सवर देखील अपलोड केला. कक्कडसोबत शोमध्ये असलेल्या आणखी दोन जणांविरोधात देखील मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलमान खानने युट्यूब, फेसबुक, ट्विट आणि गूगल सर्च इंजिनला देखील त्याच्याविषयीचा अपमानकारक कंटेंट ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. हा कंटेंट हटवण्यासाठी 14 जानेवारीला सिटी सिव्हील कोर्टात जज अनिल एच.लद्दान यांनी सलमानच्या केसची सुनावणी केली. सुनावणी दरम्यान केतन कक्कडचे वकील आभा सिंह आणि आदित्य प्रताप यांनी विरोध करत म्हटले की, गुरुवारी संध्याकाळी आम्ही या केसचे कागदपत्र मिळाले त्यामुळे आम्ही ते व्यवस्थित पाहू शकलो नाही. पुढे ते असे म्हणाले की, जर सलमान खान हा खटला दाखल करण्यासाठी महिनाभर वाट पाहू शकतो तर कक्कड यांना याचे उत्तर देण्यासाठी थोडा वेळा द्यावा. त्यानुसार, कक्कड यांना जबाब नोंदवण्यासाठी वेळा देण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 जानेवारीला होणार आहेत.


हेही वाचा – Salman Khanला एअरपोर्टवर चेकिंगसाठी थांबवलेल्या CISFच्या जवानाला शिक्षा नाही तर बक्षीस