घरमनोरंजनसलमान खानच्या Antim चा प्रदर्शनापूर्वी बोलबाला, चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला

सलमान खानच्या Antim चा प्रदर्शनापूर्वी बोलबाला, चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला

Subscribe

बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित अंतिम: द फायनल ट्रूथ सिनेमा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात सलमानसह त्याचा मेहुणा आयुष शर्मा दोन हात करताना दिसणार आहे. हा सिनेमा २६ नोव्हेंबर २०२१ ला जगभरात प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले असून प्रोडक्शनचे काम फक्त शिल्लक आहे. सलमान खानने स्वत: ट्वीट करत चाहत्यांना आगामी अंतिम: द फायनल ट्रूथ चित्रपटाबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे भाईजनच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

सलमान खानच्या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळते. मात्र प्रदर्शनापूर्वीच ‘अंतिम : द फायनल ट्रूथ’ हा चित्रपट आयएमडीबी म्हणजेच मोस्ट एंटीसिपेटेड न्यू इंडियन मुव्हीज एंड शोजच्या यादीमध्ये टॉपवर गेला आहे.

- Advertisement -

आयएमडीबीच्या अहवालानुसार, चाहत्यांकडून ‘अंतिम’ला मोठी पसंती मिळत आहे. कारण आयएमडीबीच्या रियल टाईम पॉप्युलर मीटरमध्ये पहिल्यांदा सलमानचा अंतिम पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. परंतु, काही वेगळातचं अक्षय कुमारच्या सूर्यवंशी या सिनेमाने पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. तर सलमानचा अंतिम तिसऱ्या स्थानावर गेला आहे. मात्र जय भीम हा सिनेमा दुसरे स्थान कायम ठेवले आहे.

अंतिम चित्रपटाचे पोस्टर रिलीज होताच त्याला प्रेक्षकांना डोक्यावर घेतले आहे. पोस्टरमध्ये सलमानसह आयुषचा एकदम अँग्री लूक दिसतोय. पोस्टवर सलमान आणि आयुष एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. चित्रपटातील गाण्याचीही सध्या सोशल मीडियावर धूम आहे. हा चित्रपट महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. तर सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा हा सिनेमा आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ चित्रपटामध्ये सलमान खान पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. तर आयुष गँगस्टरची भूमिका साकारत आहे.

- Advertisement -

‘लवकरच करेन साखरपुडा’, म्हणत कतरिनासोबतच्या नात्यावर विकी कौशलने केले शिक्कामोर्तब


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -