Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी सलमान खान पहील्यांदाच साकारणार 'ही' भूमिका

सलमान खान पहील्यांदाच साकारणार ‘ही’ भूमिका

लवकरच सलमान भारतीय हेर रविंद्र कौशिक यांच्यावर आधारित बायोपीकमध्ये दिसणार आहे. भारताच्या इतिहासात घडलेल्या सत्य घटनेवर हा थ्रिलर चित्रपट असणार आहे.

Related Story

- Advertisement -

सलमान खान हा असा अभिनेता आहे जो कॉमेडी पासून ड्रामा आणि ड्रामा पासून अॅक्शन व रोमान्स असलेल्या प्रत्येक रोलमध्ये फिट बसतो. दबंग अभिनयामुळे सलमानचे चाहतेही त्याच्यावर नेहमीच फिदा असतात. पण लवकरच सलमान भारतीय हेर ‘रविंद्र कौशिक’ यांच्यावर आधारित बायोपीकमध्ये दिसणार आहे. भारताच्या इतिहासात घडलेल्या सत्य घटनेवर हा थ्रिलर चित्रपट असणार आहे.

राजकुमार गुप्ता हे चित्रपट दिग्दर्शन करणार आहेत. गेल्या ५ वर्षांपासून गुप्ता कौशिक यांच्या जीवनातील घडलेल्या घटनांचा अभ्यास करत होते. त्यावरच आधारित त्यांनी चित्रपटाची कथा लिहली आहे. कौशिक यांना ब्लॅक टायगर असेही म्हटले जायचे.

- Advertisement -