Friday, February 26, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Blackbuck poaching case: जोधपूर जिल्हा व सत्र न्यायालयातून सलमान खानला मोठा दिलासा

Blackbuck poaching case: जोधपूर जिल्हा व सत्र न्यायालयातून सलमान खानला मोठा दिलासा

जोधपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने राज्य सरकारतर्फे दाखल करण्यात आलेल्या दोन्ही याचिका फेटाळल्या.

Related Story

- Advertisement -

काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर जिल्हा व सत्र न्यायालयातून बॉलिवूड अभिनेता सलमान खानला गुरूवारी मोठा दिलासा मिळाला आहे. सलमान खानविरूद्ध खोटे पुरावे सादर करण्यासंदर्भात राज्य सरकारचे प्रतिज्ञा पत्र कोर्टाने फेटाळले आहे. यापूर्वी राज्य सरकारच्या वतीने सलमान खानने दाखल केलेली याचिकाही कोर्टाने फेटाळली होती. याप्रकरणासंदर्भात सलमान खानचे वकील हस्तीमल सारस्वत म्हणाले, “जोधपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने राज्य सरकारतर्फे दाखल करण्यात आलेल्या दोन्ही याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. यासह २००६ मध्ये उत्तर दिले की, याप्रकरणात चुकीचे प्रतिज्ञापत्र दाखल झाले नाही. तर सलमान खानच्या प्रतिमेला कलंक लावण्यासाठी अशा याचिका दाखल करण्यात येत आहेत. ”विशेष म्हणजे अभिनेता सलमान खानच्या सशस्त्र परवान्याबाबत खोटे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केल्याच्या आरोपावरून २००३ मध्ये जिल्हा सत्र न्यायालयाने हा आदेश सुनावला होता. या प्रकरणासंदर्भातील चर्चा मंगळवारी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर न्यायमूर्ती राघवेंद्र कच्छवाला यांनी ११ फेब्रुवारी रोजी हा आदेश राखून ठेवला होता.

- Advertisement -

‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान खान त्याच्या सह कलाकारांसह राजस्थानला गेले होता. चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान जोधपूर जवळच्या कनकनी खेड्यातील भगोडा की धानी येथे ऑक्टोबर १९९८ च्या मध्यरात्री दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप सलमान खानवर करण्यात आला होता. यावेळी सलमान खानने काळवीट शिकार केसमध्ये खोटे प्रतिज्ञा पत्र जमा केल्याबद्दल माफी देखील मागितली होती. २००३ मध्ये सलमान खानने जोधपूर सत्र न्यायालयात एक प्रतिज्ञा पत्र सादर केलं होतं. जे नंतर खोटं असल्याचं सांगण्यात आले होते. त्यानंतर १९९८ मध्ये काळवीटाची अवैध शिकार केल्याप्रकरणी सलमान खानवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ८ ऑगस्ट २००३ रोजी सलमानकडून चुकून खोटं प्रतिज्ञा पत्र सादर केले होते यासाठी त्याला माफी मिळावी, अशी विनंती सलमान खानचे वकिल हस्तीमल सारस्वत यांनी न्यायलयाला केली.

दरम्यान, सलमानच्या सुनावणी वेळी सारस्वत असेही म्हणाले की, ८ ऑगस्ट २००३ रोजी सलमान खानने चुकीने ते प्रतिज्ञा पत्र सादर केलं होतं. मात्र सलमानच्या व्य़स्त शेड्यूलमुळे त्याला त्याची विसर पडला असून त्याचा शस्त्र परवाना नूतनीकरण करण्यासाठी देण्यात आला होता. यामुळेच सलमानने त्याचा शस्त्र परवाना हरवले असल्याचे प्रतिज्ञा पत्र न्यायालयाला दिलं होते.

- Advertisement -