सलमान खानला ३ वेळा सर्पदंश; ‘Birthday’ च्या दिवशीच सांगितले किस्से

Salman Khan gets snake bite 3 times; Tales told on the day of 'Birthday'
सलमान खानला ३ वेळा सर्पदंश; 'Birthday' च्या दिवशीच सांगितले किस्से

बॉलीवूडचा दबंग सलमान खान याला काल रात्री २६ डिसेंबरला सर्पदंश झाल्याची घटना घडली.या घटनेचा संपूर्ण खुलासा खुद्द सलमान खान याने केला आहे. सलमानचा आज ५६ वा वाढदिवस असून,त्याने त्याचा वाढदिवस आपल्या परिवारातील काही सदस्यांसोबत आणि काही मित्रपरिवारासोबत साजरा केला.वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर बॉलीवूडच्या टायगरला सर्पदंश झाला होता. त्यानंतर त्याला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. काही तासांच्या उपचारानंतर त्याला हॉस्पीटलमधून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर तो पुन्हा आपल्या पनवेलच्या फार्म हाऊसवर पोहोचला. थोड्यावेळानंतर प्रकृती स्थिरावल्यावर त्याने वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले. त्याने या वाढदिवसाच्या सेलिब्रेशननंतर सर्पदंशाचे किस्से सांगितले आहेत. याशिवाय त्याच्या प्रकृतीचीही अपडेट दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@salmankhanfanclub)

काय म्हणाला ‘सलमान खान’ ?

माझ्या पनवेलच्या फार्महाऊसमध्ये एक साप शिरला होता.मी त्याला एका काठीच्या मदतीने बाहेर नेले.मात्र थोड्यावेळाने तो माझ्या हाताजवळ येऊ लागला.त्यानंतर मी त्या सापाला फार्महाऊसच्या बाहेर सोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्याने मला तीन वेळा दंश केला. या सर्पदंशाच्या उपचारासाठी मी ६ तास रुग्णालयात दाखल होतो.आता माझी प्रकृती ठीक आहे, अशी माहिती अभिनेता सलमान खानने दिली आहे.

सलमान खानला पनवेलच्या फार्म हाऊसवर सर्पदंश ; बिनविषारी सापामुळे अनर्थ टळला

सलमानचे वडील म्हणाले…

जेव्हा ही घटना घडली तेव्हा आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो. सलमान इंजेक्शन घेण्यासाठी जवळच्याच मेडिकलमध्ये गेला होता. बिनविषारी साप असल्याचे समजल्यावर आम्हाला खूप बरे वाटले, सलमान खानच्या वडिलांनी म्हणजेच सलीम खान यांनी सांगितले. याशिवाय पनवेलच्या फार्महाऊसवरील स्टाफला कधी कधी साप किंवा विंचू चावण्याच्या घटना घडत असतात, असा खुलासा सलीम खानने केला आहे.


हे ही वाचा – Janhvi Kapoor: साऊथ इंडियन लूक करुन जान्हवी कपूर पोहोचली तिरुपती तिरुमालाच्या दर्शनाला