Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Salman Khan Girlfriend : सोमी अलीचा धक्कादायक खुलासा ; म्हणाली, 'सलमानने माझी...

Salman Khan Girlfriend : सोमी अलीचा धक्कादायक खुलासा ; म्हणाली, ‘सलमानने माझी फसवणूक केली ‘

Subscribe

सलमान खान आणि सोमी अलीच्या रिलेशनशिपच्या चर्चा मोठ्या प्रमाणात गाजल्या होत्या.सलमान खान आणि सोमी जवळजवळ आठ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. हे दोघेही 1991 ते 1999 पर्यंत डेट करत होते.

बॉलीवूडचा दबंग सलमान खान याने सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्रींचे करिअर घडवण्यासाठी त्यांना पांठिबा दिल्याचे आपण ऐकले आहे. सलमान खान हा बऱ्याच अभिनेत्रींसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्याही बऱ्याच चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या पाहायला मिळतात. त्यातच सलमान खान आणि सोमी अलीच्या रिलेशनशिपच्या चर्चा मोठ्या प्रमाणात गाजल्या होत्या.सलमान खान आणि सोमी जवळजवळ आठ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. हे दोघेही 1991 ते 1999 पर्यंत डेट करत होते. त्यांच्या ब्रेकअपनंतर सोमीने बॉलीवूडमधून निरोप घेतला होता. काही दिवसांनी ती परदेशात राहण्यासाठी गेली.नुकतंच सोमी अलीने एका मुलाखती दरम्यान सलमान खानवर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. याशिवाय सलमान खान सोबत रिलेशनशिपमध्ये असतानाचे अनेक किस्से तिने सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Somy Ali (@realsomyali)

- Advertisement -

‘माझे सलमानवर खूप क्रश होते.मी फक्त 16 वर्षांची असताना त्याच्याशी लग्न करायचे स्वप्न घेऊन मी मुंबईत आले, असे एका मुलाखती दरम्यान सोमी अलीने सांगितले.यानंतर सोमीने सलमानसोबत एका चित्रपटाचे शूटींगही केले.मात्र काही कारणास्तव हे शूटिंग रद्द करण्यात आले. एके दिवशी नेपाळला जाताना तिने सलमानकडे लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली.मात्र,त्यावर सलमानने ‘माझी गर्लफ्रेंड आहे’ असे उत्तर दिले होते. त्यावर सोमीने, मला काही फरक न पडत असल्याचे सांगितले. त्यानंतर एका वर्षाने ते दोघे रिलेशनशिपमध्ये आले.तेव्हा सलमानने तिच्यावर खूप प्रेम करत असल्याचे म्हटले होते,पण त्यावेळेस ते तिला फारसे काही पटले नव्हते.

सोमी अलीने वयाच्या १६ व्या वर्षी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.सोमी अलीने ‘यार गद्दार’, ‘कृष्ण अवतार’ आणि ‘एंट’ यांसारख्या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.तिने फार कमी वेळ बॉलीवूडमध्ये काम केले.


- Advertisement -

हेही वाचा – ‘Grammy Awards’ सोहळ्यावर ओमिक्रॉनचे सावट


 

- Advertisment -