Blackbuck Poaching Case : काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला दिलासा; आता सर्व प्रकरणावर सुनावणी हायकोर्टातच होणार

india does not live between cuff parade and andheri said salman khan during interview
"भारत देश हा फक्त कफ परेड ते अंधेरीदरम्यान' सलमान खानच्या विधानाची चर्चा

काळवीट शिकार प्रकरणी बॉलिवूड अभिनेता सलमान खानला राजस्थान उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपीठात सलमान खानच्या हस्तांतरण याचिकेवर सुनावणी झाली. आता सलमान खानशी संबंधित सर्व याचिकांवर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. वकील हस्तीमल सारस्वत यांनी सलमानची बाजू भक्कमपणे मांडली. यावेळी हायकोर्टाने हस्तांतरण याचिकेवर निर्णय देताना सलमानच्या सर्व याचिकांवर हायकोर्टात सुनावणी करण्यास मान्यता दिली आहे.

या सुनावणीदरम्यान सलमान खानची बहीण अलविरा हायकोर्टात हजर होती. त्यामुळे पुन्हा एकदा अभिनेत्याची बहीण अलविरा त्याच्यासाठी लकी चार्म ठरली आहे.

1998 मध्ये अभिनेता सलमान खानला जोधपूरजवळील एका गावात दोन काळवीटांची शिकार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. यावेळी सलमान ‘हम साथ-साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने जोधपूरमध्ये होता. सलमानविरोधात शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी सलमान खानला अटक करून जोधपूर तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. तीन दिवसांनंतर न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने त्यांची सुटका करण्यात आली. सलमान खानने त्याला सुनावलेल्या पाच वर्षांच्या शिक्षेला आव्हान दिले आहे. त्याचवेळी आर्म्स ऍक्ट प्रकरणी न्यायालयाने सलमानची निर्दोष मुक्तता केली होती. या निर्णयाला राजस्थान सरकारने न्यायालयात आव्हान दिले.यावेळी या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने सलमान खानविरोधातील राजस्थान सरकारची याचिका फेटाळून लावली. यानंतर 2021 मध्ये जोधपूरच्या जिल्हा कोर्टातून सलमान खानला या प्रकरणात दिलासा मिळाला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर सलमान खानच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली होती.


उपमुख्यमंत्र्यांच्या निरोपालाही धुडकावले, बीड नगरपालिकेचे चार अभियंते निलंबित; तर सीईओंची चौकशी होणार