घर मनोरंजन सलमान खानने मुलाच्या मदतीसाठी केली Bone Marrow Test; सुनील शेट्टींने सांगितला 'तो'...

सलमान खानने मुलाच्या मदतीसाठी केली Bone Marrow Test; सुनील शेट्टींने सांगितला ‘तो’ किस्सा

Subscribe

सुनील शेट्टी हा इंडस्ट्रीतील अशा काही लोकांपैकी एक आहे, जो सलमान खानला खूप जवळून ओळखतो आणि त्याच्यासोबत चांगले बाँडिंग शेअर करतो.

बॉलिवूडचा अभिनेता आणि दंबग सलमान खान (Salman Khan) हा ‘गोल्डन हार्ट’ आहे हे आपल्या सर्वांच माहिती आहे. सलमानच्या या स्वभावामुळे त्याला त्याचे चाहात्यांनी ‘भाई’ अशी उपाधी दिली आहे. सलमान हा नेहमीच गरजू लोकांना मदत करण्यासाठी तत्पर असतो. सलमाने एका गरीब मुलांना मदत करण्यासाठी सतत धडपडत असतो. पण, सलमान हा समाजासाठी केलेल्या कामाचे कधीच कुठे बोलून दाखवित नाही.

दरम्यान, सलमानच्या या स्वभावाचे इंडस्ट्रीतील सर्वच कलाकार कौतुक करत असतात. त्यात अभिनेता सुनील शेट्टी (Sunil Shetty) अपवाद नाही. सुनील शेट्टीने दबंग खानबद्दलचा तो किस्सा त्यांनी शेअर केला आहे. त्याबद्दल क्वचितच कोणाला माहिती असेल, असे वाटत नाही.

- Advertisement -

सुनील शेट्टीने केले सलमान खानचे कौतुक 

- Advertisement -

सुनील शेट्टी हा इंडस्ट्रीतील अशा काही लोकांपैकी एक आहे, जो सलमान खानला खूप जवळून ओळखतो आणि त्याच्यासोबत चांगले बाँडिंग शेअर करतो. सलमानबद्दल बोलताना सुनील शेट्टी म्हणाला, ‘मी नेहमीच म्हणत आलो की, माझ्यासारखा सलमानला कोणी ओळखत नाही.’ फक्त एक-दोनदाच नाही तर असे अनेक प्रसंग आले आहेत. जेव्हा सुनील शेट्टीने सलमानचे कौतुक करत आहे.

जेव्हा सलमानने सुनील शेट्टीचा फोन उचलला नाही

सुनील शेट्टी म्हणाले, ‘मला अजूनही आठवते की, कोणीतरी त्याला पुन्हा पुन्हा कॉल करत होते. तो गेला आणि मी विचारले की तो कुठे जात आहे. पण, त्याने मला सांगितले नाही. मला काम असे सांगून तो निघून गेला. काम झाल्यावर परत येईन, असे सांगितले. यानंतर मला कळले की, सलमान हा बोन मॅरो कॅन्सर (Bone Marrow Cancer) झालेल्या मुलासाठी बोन मॅरो टेस्ट (Bone Marrow Test) करायला गेला होता आणि माझ्या माहितीनुसार, ही सर्वात क्लेशदायक टेस्ट आहे. त्याने मला सांगितलेही नाही की तो निघून गेला. टेस्ट करून तो परत आला, मग आम्ही भेटलो. त्यांनी लोकांसाठी खूप काही केले आहे. मी भौतिक गोष्टींबद्दल अजिबात बोलत नाही. ‘being human’ या आपल्या चॅरिटेबल फाऊंडेशनद्वारे सलमान गरजूंना मदत करतो.

 

- Advertisment -