सध्या सलमान खान लॉकडाऊनमुळे आपल्या फार्महाऊसवर आडकला आहे. सलमान आणि त्याचा भाचा सध्या फार्महाऊसवर क्वारंटाईन टाईम स्पेंड करत आहेत. सलमान खान पनवेलच्या फार्महाऊसवर आहे. फार्महाऊसवरचे अनेक सलमान अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. पण नुकताच सलमानने शेअर केलेला व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये घोड्याबरोबर सलमान ब्रेकफास्ट करताना दिसतोय. सलमानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचडं व्हायरल झाला असून त्याच्या चाहत्यांनी त्याचं कौतुकही केलं आहे.
सलमानने शेअर केलेला हा व्हीडिओ काहीसा हटके आहे. सलमाननं ‘ब्रेकफास्ट विथ माय लव्ह’ असं कॅप्शन दिलं आहे. शेअर केलेल्या या व्हिडिओत सलमान घोड्याला चारा भरवताना दिसतोय विशेष म्हणजे घोड्याला चारा भरवताना तो सुद्धा चारा खात आहे. आणि सलमानला हा चारा खूप आवडल्याचही तो म्हणत आहे.
अभिनेता सलमान खानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांना घरातून बाहेर पडू नका असं सांगितलं आहे. हे सांगताना त्याचा प्रसिद्ध डायलॉग ‘जो डर गया, समझो मर गया’ या डायलॉगचा आधार घेत हे पटवून दिलं आहे की, ‘जो डर गया, समझो बच गया’ हा या परिस्थीतीत योग्य डायलॉग आहे. त्यामुळे तुम्ही घरीच रहा, नसतं साहस करू नका. असा सल्ला दिला आहे.