घरमनोरंजनकाय सांगताय! सलमान खानचे लग्न झालंय, पत्नी आणि सतरा वर्षीय मुलगी दुबईत...

काय सांगताय! सलमान खानचे लग्न झालंय, पत्नी आणि सतरा वर्षीय मुलगी दुबईत आहेत

Subscribe

सलमान कधी आणि कोणाशी लग्न करणार? असा प्रश्न सलमानच्या चाहत्यांसह संपुर्ण देशाला पडला आहे.

बॉलिवूडमधील दबंग स्टार सलमान खानची फॅन फॉलोइंग प्रचंड मोठी आहे. सलमानच्या प्रत्येक हालचालीवर चाहते बारीक नजर ठेवून असतात असे म्हणायला हरकत नाही. पण सलमान खान कधी लग्न करणार हे त्याच्या चाहत्यांना अद्याप कळू शकले नाही. भाईजान लग्नबंधनात केव्हा अडकणार? हा आता जागतिक प्रश्न झाला आहे. पण नुकतच सलमानचे लग्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. हे ऐकून सलमानसह त्याच्या चाहत्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. यामुळे सगळीकडेच एकच खळबळ उडाली आहे. सलमानची बायको दुबईमध्ये राहत असून त्यांना  17 वर्षाची एक मुलगी देखील आहे अशी माहिती उघडकीस आली आहे. पण सलमान खानने या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केलं आहे. सोशल मीडियावर अनेकदा नेटकरी कलाकारांना टर्गेट करून त्यांच्या पोस्टवरील कंमेंट बॉक्समध्ये काही अतरंगी कमेंट करतात यामुळे अनेकदा कलाकारांना नाहक त्रासला सामोरे जावे लागते. अशातच एका ट्रोलर्सने सलमानला कमेंट करत लिहले की “कुठे लपून बसला आहे घाबरट. भारतात सगळ्यांना माहित आहे की तू तुझ्या पत्नी आणि 17 वर्षांच्या मुलीसह दुबईत आहेस. भारतीयांना अजून कीती मूर्ख बनवणार आहेस.” या ट्रोलर्सच्या ओरोपावर स्पष्टीकरण सलमानने त्याच्या भावाच्या म्हणजेच अरबाज खानच्या एका टॉक शोमध्ये दिले आहे. अरबाजच्या टॉक शो कार्यक्रमात नुकतच सलमान खानने हजेरी लावली होती यावेळीस अरबाजने सोशल मीडियावरील एका ट्रोलरची कमेंट शेअर करत सलमानला उत्तर देण्यास सांगितले.

सलमान खानने दिले स्पष्टीकरण

 

- Advertisement -

सलमानने या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट करत त्याचे लग्न झाले असल्याची बातमी खोटी आहे असे सांगितले, “ मला कळत नाहीये या युझर्सने अशी पोस्ट का केली आहे. हे सगळं खोट आहे.लोकांना माझ्याबद्दल सर्व काही ठाऊक आहे. त्या व्यक्तीला आता मी सन्मानीत करणार आहे.भाई सगळ्यांना माहितीये माझं लग्न झालेलं नाही.मी गेल्या नऊ वर्षापासून भारतामध्ये मुंबईत गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. सगळ्यांना माहिती आहे मी कुठे राहतो” सलमानने देखील मजेशीर अंदाजात ट्रोलर्सला सुनावत त्याचे मत मांडले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial)

- Advertisement -

पण सलमान कधी आणि कोणाशी लग्न करणार? असा प्रश्न सलमानच्या चाहत्यांसह संपुर्ण देशाला पडला आहे. अशातच सलमानचे लग्न झाल्याची अफवा पसल्याने चाहत्यांनध्ये देखील गोंधळ उडाला आहे.


हे हि वाचा – राज कुंद्रा प्रकरणात अभिनेता उमेश कामतची नाहक बदनामी, शहानिशा न करता वापरला फोटो

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -