घरमनोरंजनVideo: सलमानच्या 'हुड हुड दबंग' टायटल ऑडिओ ट्रॅकनंतर व्हिडिओ रिलीज

Video: सलमानच्या ‘हुड हुड दबंग’ टायटल ऑडिओ ट्रॅकनंतर व्हिडिओ रिलीज

Subscribe

‘हुड़ हुड़ दबंग दबंग’ या गाण्याचा ऑडिओ रिलीज केल्यानंतर आता त्याचा व्हिडिओ लाँच करण्यात आला आहे

बॉलिवूड अभिनेता सलमान खान लवकरच सुपरहिट चित्रपट सिरीजमधल्या आगामी दबंग ३ या चित्रपटासह धमाकेदार एन्ट्रीसाठी तयार आहे. या चित्रपटात सलमान खानचा अंदाज आणि अॅक्शनकरता जितका प्रसिद्ध आहे तितकाच चित्रपटाच्या गाण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. हेच लक्षात घेत चित्रपटाच्या गाण्याचे टायटल ट्रॅक ‘हुड हुड’ (Hud Hud) तयार करण्यात आले आहे. या गाण्याचे ऑडिओ व्हर्जन देखील पहिलेच रिलीज करण्यात आले होते. मात्र याच गाण्याचा आता व्हिडिओ नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

- Advertisement -

दबंग ३ या चित्रपटाच्या ऑडिओ गाण्याने युट्यूबवर साधारण १० मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. चुलबूल पांडेने एक पोस्टसह आपल्या सोशल मीडियावर हे गाणं शेअऱ केले आहे.

- Advertisement -

सलमानच्या या गाण्याच्या ऑडियो व्हर्जनला ‘दबंग ३ (Dabangg 3)’ चित्रपटाच्या गाण्याला चाहत्य़ांची चांगलीच पसंती मिळत आहे. अभिनेता सलमान खान, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांचा ‘दबंग ३ चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी फक्त ५० दिवस बाकी असताना हे गाणं रिलीज करण्यात आलं होतं.

‘हुड़ हुड़ दबंग दबंग’ या गाण्याचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या गाण्याचा व्हिडिओ सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. या आधी ‘हुड़ हुड़ दबंग दबंग’ या गाण्याचा ऑडिओ रिलीज करण्यात आला होता. मात्र आता त्याचा व्हिडिओ लाँच करण्यात आला आहे. ही पहिलीच वेळ आहे की, एखाद्या चित्रपट प्रदर्शित होण्याच्या ५० दिवस आधी या गाण्याचा टायटल ट्रॅक लाँच करण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -