सलमानचा नवा शो ‘हाऊस ऑफ भाईजान’, सांगणार सिक्रेटस, लुलीयाही दिसेल शो मध्ये!

तीन हीट गाण्यांनंतर भाईजानचा नवा शो...

Salman Khan will release 'Bhaijaan' in Diwali, not Eid this year
यंदा ईदला नाही तर दिवाळीमध्ये सलमान खान करणार ‘भाईजान’ रिलीज

अभिनेता सलमान खानची लोकप्रियता किती आहे हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि याची कल्पना सलमान खानला चांगलीच आहे. त्यामुळे त्यालाही समजलं आहे की आता चाहत्यांसमोर काय प्रेझेंट करायचं. कारण सलमानने काहीही केलं तरी चाहत्यांच्या त्याच्यावर उड्या पडतात. त्यामुळे आपल्या तीन हिट गाण्यांनंतर सलमान त्याचा नवा टीव्ही शो घेऊन येत आहे. या शोचं नाव आहे हाऊस ऑफ भाईजान.

अभिनेता सलमान खान सध्या पनवेलच्या फार्म हाऊसवर आहे. लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा तो तिथे होता. त्यामुळे खरंतर तो तिथे अडकला. पण तो काही एकटा नव्हता त्याच्यासोबत लुलिया वंतुर, जॅकलिन फर्नांडिस आणि त्याचे काही कुटुंबिय होते. पण चौथा लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर बांद्र्याला गेला. वडिलांना भेटला आणि पुन्हा पनवेलच्या फार्म हाऊसवर परत आला. पण सलमानने अस का केलं, याचा उलगडा त्याच्या या शोच्या घोषणेनंतर झाला आहे.

काय आहे हाऊस ऑफ भाईजान

पनवेलमध्ये लॉकडाऊन काळातला त्याचं रोजचं जगणं उलडणार आहे. हा शो कधीपासून येणार.. त्याची वेळ काय असेल हे अद्याप निश्चित नाही. पण या शोमध्ये सलमान तर असेलच,. शिवाय जॅकलिन फर्नांडिस, लुलिया या शोमध्ये दिसू शकते. या शोसाठी त्याने भली मोठी रक्कम घेतल्याचं कळतं आहे. हा शो कलर्स वाहिनीवर दिसू शकतो. त्याच्या हा शो ही त्याच्या चहत्यांना आवडेल यात काही शंका नाही कारण त्या सलमान स्वत: असणार आहे. कारण सिनेमातला हिरो रोजच्या जगण्यात काय करतो.. कसा जगतो हे लोकांना हवंच असणार आहे. इथे तर सलमानचं रोजचं जगणं दिसेल. त्यामुळे चाहते खूश होणार यात शंका नाही.

लॉकडाऊनदरम्यान भाईजानची मात्र एक दोन नव्हे तर चक्क तीन गाणी आणली. एक कोरोनाचं होतं. दुसरं जॅकलिनसोबतचं सिंगल होतं तर तिसरं ईदला त्याने त्याच्या चाहत्यांसाठी आणलं. त्याच्या तीन गाण्यांना तुफान पसंती मिळाली.


हे ही वाचा – जबरदस्त ऑफर! BSNL ग्राहकांना तब्बल ४ महिने देणार मोफत सेवा!