घर मनोरंजन गदर-2 वर भाईजान फिदा म्हणाला....

गदर-2 वर भाईजान फिदा म्हणाला….

Subscribe

सनी देओलचा नुकताच प्रदर्शित झालेला गदर-2 ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. 11 ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची सर्वत्र सध्या धूम आहे. गदर सिनेमाचे प्रेक्षक या सिनेमाचा सिक्वल पाहण्यासाठी फार उत्सुक आणि प्रतिक्षा करत होते. अशातच आता सिनेमा प्रदर्शित झाला आहे तर त्याला भरभरून प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. याच दरम्यान, अभिनेता सलमान खान याने सुद्धा सिनेमाचे कौतुक केले आहे. (Salman khan post on Gadar-2)

सलमानने सोशल मीडियात गदर- 2 संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांने सिनेमाच्या पहिल्याच दिवशीच्या कमाईबद्दल ही लिहिले आहे. सलमानने गदर-2 चे पोस्टर शेअर करत असे म्हटले की, ढाई किलो का हाथ 40 करोड़ की ओपनिंग के बराबर. सनी पाजी जबरदस्त. गदर-2 च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

- Advertisement -

रिपोर्ट्सनुसार, सिनेमाने पहिल्याच दिवशी 40-45 कोटींदरम्यान कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सिनेमाने पहिल्याच दिवशी नक्की किती कमाई केली याचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही.

- Advertisement -

सिनेमातील स्टारकास्टबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये अमीषा पटेल, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर आणि मनीषा वाधवा सारखे स्टार आहेत. हा सिनेमा 2001 मध्ये आलेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’ चा सिक्वल आहे. गदर हा ऑलटाइम ब्लॉकबस्टर राहिला होता.


हेही वाचा- Gadar 2 Movie Review: दिग्दर्शकाने हरवली सनी देओलची जादू

- Advertisment -