घरमनोरंजनसलमान खानच्या 'राधे' सिनेमाविरोधात ट्विटरवर #BoycottRadhe चा ट्रेंड सुरु

सलमान खानच्या ‘राधे’ सिनेमाविरोधात ट्विटरवर #BoycottRadhe चा ट्रेंड सुरु

Subscribe

बॉलिवूड दबंग सलमान खानचा मोस्ट अवेडेट सिनेमा राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई रिलीज होऊन काही तास उलटत नाही तोपर्यंत या सिनेमा विरोधात आता बहिष्काराची मागणी केली जात आहे. हा सिनेमा अनेक प्रेक्षकांचा पसंतीसही पडत आहे. मात्र बहुतेक जण या सिनेमाविरोधात बॉयकॉट राधे चा ट्रेंड चालवत आहेत. राधे सिनेमाचा रिलीजनंतर ट्विटरवर सध्या ‘#राधे फिल्म का बहिष्कार करो’ हा ट्रेंड दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याचे फॅन्स अनेक बॉलिवूड कलाकारांवर नाराज आहे. या सलमान खानचाही नंबर लागतो. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतरही त्याला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक फॅन्स ट्विटरवरून आवाज उठवत आहेत. यात सलमान खानचा सिनेमा रिलीज झाल्यानंतर फॅन्सनी पुन्हा बॉलिवूड कलाकारांविरोधात आपला मोर्चा वळवला आहे. तीन आठवड्यापूर्वी राधे सिनेमाचे पहिले पोस्टर लॉन्च झाले होते तेव्हाही ट्विटरवर राधे सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात होती.

- Advertisement -

एका युझर्सने राधे सिनेमावरून सलमान खानला टार्गेट करत लिहिले की, “बॉलिवूड माफिया, अँटी नॅशनल आणि ड्रग्स घेणाऱ्या लोकांचे अंडरवर्ल्डशी जवळचे संबंध आहेत. आमच्या मेहनतीचे पैसे यालोकांवर खर्च होत होती मात्र आता नाही. राधे सिनेमावरील बहिष्कारासंबंधीत ट्विटरवरील ट्रेंडला सपोर्ट करा.”

- Advertisement -

तर दुसऱ्या एका युझर्सने लिहिले की, “जेव्हा कधी अभिनेता सलमान खानला पाहते तेव्हा मी सुशांत सिंह राजपूतच्या मर्डर मिस्ट्रीबद्दल विचार करु लागते. जी आजही सुटलेली नाही. मिस यू सुशांत भाई.”

असे अनेक ट्विट सध्या ट्विटरवर पोस्ट होत आहेत.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -