विल स्मिथने कानशिलात लगावल्याच्या प्रकरणावर बॉलिवूडचा भाईजान म्हणाला…

Salman Khan reacts to Will Smith slapping Chris Rock: 'As a host, you have to be sensitive'
विल स्मिथने कानशिलात लगावल्याच्या प्रकरणावर बॉलिवूडचा भाईजान म्हणाला...

९४व्या ऑस्कर सोहळ्यादरम्यान विल स्मिथने होस्ट क्रिस रॉकला कानशिलात लगावल्याच्या प्रकरणावर प्रत्येक जण आपले मत मांडत आहे. बॉलिवूडचे सेलिब्रिटी देखील याबाबत बोलत आहे. बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कंगना रनौत हिने विल स्मिथला पाठिंबा दर्शवला आहे. ती म्हणाली की, ‘जर एखादा मुर्ख माणूस लोकांना हसवण्यासाठी माझ्या आई किंवा बहिणीची अशी चेष्टा करत असेल तर मी देखील तेच करेल जे स्मिथने केले.’ याबाबत बॉलिवूडच्या भाईजान सलमान खाननेही आपले मत मांडले आहे. शिवाय शो होस्ट करणाऱ्याबाबत एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे.

इंग्रजी वेबासाईट टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अलीकडेच सलमान खानने एका कार्यक्रमात भाग घेतला होता. या कार्यक्रमात सलमानाने माध्यमांशी बातचित केली. यादरम्यान सलमान खानने विल स्मिथने क्रिस रॉकला लगावलेल्या कानाशिलाबाबत प्रतिक्रिया दिली. सलमान म्हणाला की, ‘स्टेजवर मस्करी करताना खूप काळजी घेतली पाहिजे. कोणतीही गोष्टी हाताबाहेर गेली नाही पाहिजे.’

पुढे सलमान खान म्हणाला की, ‘होस्ट संवेदनशील असणे खूप महत्त्वाचे आहे. मस्करी नेहमी लिमिटमध्ये झाली पाहिजे आणि कधीही पातळी ओलांडली नाही पाहिजे. मी स्टेजवर बिग बॉस, दस का दम आणि बरेच सारे लाईव्ह शो होस्ट केले आहेत. जेव्हा मी बिग बॉस होस्ट करतो आणि कोणत्याही सदस्यासोबत काही चुकीचे झाले आहे, ज्याने मला निराश केले आहे, तर मी शोच्या बाहेर जायला सांगतो. परंतु मला माहिती असते की, एक सीमा असते. तसेच सदस्याप्रती संवेदनशील असणे गरजेचे असते. मी पातळी कधीही ओलांडत नाही. मला जे काही बोलायचे असते, ते मी शनिवार, रविवारी सर्व काही बोलतो. मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही बकवास व्यक्तीसोबत काम करत नाही.’