Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Antim Poster : 'अंतिम' पोस्टरला भाईजानच्या चाहत्यांचा खतरनाक प्रतिसाद!

Antim Poster : ‘अंतिम’ पोस्टरला भाईजानच्या चाहत्यांचा खतरनाक प्रतिसाद!

सिनेमाच्या पोस्टरवर दोन प्रमुख पुरुषांमधला एक महाकाय संघर्ष यातून दिसतो आहे. चित्रपट ‘अंतिम’चे कथानक मुख्यत्वे करून पोलीस आणि वेगवेगळ्या विचारधारांचे गैंगस्टर यांच्या आसपास फिरते.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडचा(bollywood) भाईजान सलमान खानचा(salmaan khan)’अंतिम द फाइनल ट्रुथ'(antim) सिनेमाची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. नुकतच मेकर्सने सिनेमाच पहिलं-वहिलं पोस्टर प्रदर्शित केलं(antim movie poster releases) असून या पोस्टरमध्ये सलमानचा जबरदस्त लूक पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर (social media)या बहुप्रतिक्षीत सिनेमाचा पोस्टर व्हायरल होत असून चाहत्यांनी तर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.(Salman Khan Releases First Poster Of Antim The Final Truth)सिनेमात सलमान खानच्या अपोझिट अभिनेता आयुष शर्मा(ayush sharma) झळकणार असून या चित्रपटातून चाहत्यांना असलेल्या अपेक्षांची झलक या पोस्टरद्वारे पाहायला मिळते आहे. पोस्टरमध्ये सलमान खान आणि आयुष शर्मा (salman and ayush)एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून रोखून बघत आहेत यावरून हे स्पष्ट आहे की ही लढाई अंतिम असेल.

सिनेमाच्या पोस्टरवर दोन प्रमुख पुरुषांमधला एक महाकाय संघर्ष यातून दिसतो आहे. चित्रपट ‘अंतिम’चे कथानक मुख्यत्वे करून पोलीस आणि वेगवेगळ्या विचारधारांचे गैंगस्टर यांच्या आसपास फिरते. दोन नायक असलेला हा चित्रपट, ‘अंतिम’ पूर्णपणे दोन वेगवेगेळी विश्व आणि विचारधारांच्या दोन नायकांमधील संघर्षाला समोरा-समोर आणते, ज्यातून एक भयकंपित आणि अंगावर काटा आणणारा भयानक अंत पहायला मिळतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

- Advertisement -

ही पहिलीच वेळ आहे जेव्हा, सलमान खान आणि आयुष शर्मा एकमेकांसोबत स्क्रीन शेयर करताना दिसणार आहेत. यामुळे प्रेक्षकांना हा सिनेमा कधी रिलीज होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

- Advertisement -

सलमान खान फिल्म्स द्वारा प्रस्तुत, ‘अंतिम’ सलमा खान द्वारा निर्मित आणि महेश मांजरेकर यांच्याद्वारे दिग्दर्शित आहे. तसेच ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट मराठी हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक असून चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. अभिनेता सलमान खानच्या भूमिके विषयी सांगायचे झाल्यास सलमान खान एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून आयुष गँगस्टरची भूमिका साकारणार आहे. तसेच या सिनेमातून अभिनेत्री महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.


हे हि वाचा – तारक मेहता… फेम सोनूचा कातिलाना अंदाज पाहून चाहते झाले फिदा !

- Advertisement -