Main Chala Teaser Out : सलमान खानचे नव्या वर्षातील ‘मै चला’ गाण्याचा टीझर लाँच

salman khan romantic song main chala teaser out now lulia vantur guru randhawa
Main Chala Teaser Out : सलमान खानचे नव्या वर्षातील 'मै चला' गाण्याचा टीजर लाँच

बॉलिवूडचा दबंग सलमान खानचे चाहते त्याचा आगामी प्रोजेक्टकडे डोळे लावून होते. अशातच भाईजान सलमान खान त्याच्या चाहत्यांसाठी एक सुंदर भेट घेऊन आला आहे. 22 जानेवारीला सलमान खानचे एक नवं गाणं रिलीज होणार आहे, जे अनेक अर्थाने खास आहे. कारण या रोमँटिक गाण्यात सलमान खानसोबत तेलगू अभिनेत्री प्रज्ञा जयस्वाल दिसणार आहे. चाहत्यांसाठी आणखी एक गुडन्यूज म्हणजे सलमान खानचे हे गाणे पंजाबी गायक गुरु रंधावा आणि सलमान खानची जवळची मैत्रीण युलिया वंतूर यांनी गायले आहे.

सलमान खानच्या गाण्याचा टीझर आऊट

सलमान खानने त्याच्या ‘मैं चला’ या गाण्याचा एक टीझर शुक्रवारी सोशल मीडियावर रिलीज केला आहे. हे गाणे भाईजानच्या चाहत्यांसाठी एक व्हिज्युअल ट्रीट असणार आहे. या गाण्याचे बोल शब्बीर अहमद यांनी लिहिले असून यातून गुरू रंधावाची युलिया वंतूरसोबतची जुगलबंदी चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

या गाण्याच्या टीझरमध्ये सलमान खान कधी लांब केसांमध्ये तर कधी शीख लूकमध्ये दिसतोय. यात सलमान आणि प्रज्ञा रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. गाण्याची एक झलक पाहून चाहते वेडे झाले आहेत. त्यामुळे चाहते आता गाण्याच्या रिलीजची वाट पाहत आहेत. प्रज्ञाची सलमान खानसोबतची केमिस्ट्री रिफ्रेशिंग दिसते. टीझर ही झलक इतकी दमदार आहे की यावरून गाणे किती मस्त असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता.

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, अंतिम हा त्याचा शेवटचा सिनेमा होता. या सिनेमात त्याच्यासोबत महिमा मकवाना आणि आयुष शर्मा यांनी काम केले होते. सलमान खानच्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. सलमान खानचे अनेक चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. ज्याच्या रिलीजची चाहत्यांना नेहमीच प्रतीक्षा असते.


पालिकेत पुन्हा एकदा शिवसेना – भाजपात खडाजंगी