सलमान खानने महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमात चालवला चरखा

Salman Khan runs a charkha at Mahatma Gandhi's Sabarmati Ashram
सलमान खानने महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमात चालवला चरखा

बॉलीवूडचा दबंग सलमान खान याने आज २९ नोव्हेंबरला साबरमतीमधील महात्मा गांधींच्या ऐतिहासिक आश्रमाला भेट दिली आहे. सलमानने या भेटी संदर्भात व्हिजिटर बुकमध्ये आपले मत व्यक्त केले आहे. “इथे यायला खूप आवडले आणि हा क्षण मी कधीच विसरणार नाही”,असे व्हिजिटर बुकमध्ये सलमानने म्हटले आहे. सलमान खान ‘अंतिम’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अहमदाबादमध्ये आपल्या टीम समवेत आला होता.या दरम्यान त्याने महात्मा गांधींच्या आश्रमाला भेट दिली आहे. सलमान खानने हिरव्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला असून, त्याने महात्मा गांधींचा चरखा चालवण्याचा प्रयत्न केला आहे.

‘अंतिम’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अहमदाबादमध्ये आलेल्या सलमानची एक झलक पाहण्यासाठी आश्रमातही त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी झाली होती. सुमारे १० ते १५ मिनिटे ते साबरमती नदीच्या काठावरील आश्रमात थांबले होते. ऐतिहासिक स्थळावरील महात्मा गांधींच्या ‘हृदय कुंज’ या निवासस्थानाला त्यांनी भेट दिली. त्याच्या व्हरांड्यात बसून सलमानने चरखा चालवण्याचा प्रयत्न केला. हा तोच चरखा आहे ज्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक राष्ट्रप्रमुखांनी चरखा चालवण्याचा प्रयत्न केला.

सलमानच्या चाहत्यांनी ‘अंतिम’ चित्रपटाच्या पोस्टरला दुधाने केला अभिषेक

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमान खानच्या काही चाहत्यांनी ‘अंतिम’ चित्रपटामधील अभिनेता सलमान खानच्या पोस्टरला दुधाने अभिषेक केला.हा व्हिडिओ शेअर करत सलमान खानने चाहत्यांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे. “अनेक नागरिक हे पाण्यावाचून आपला दिवस कसाबसा घालवत आहेत.अनेक लोकांच्या नशीबात पाण्याची कमी असते आणि तुम्ही अशाप्रकारे पोस्टरचा अभिषेक करुन दुध वाया घालवता.माझी चाहत्यांना एक विनंती आहे की,हे दुध त्या मुलांना द्या ज्या लहान मुलांना प्यायला दुध मिळत नाही.”,असे कॅप्शन लिहिले आहे.

 

‘अंतिम’ पाहणाऱ्यांनी सिनेमागृहात फोडले होते फटाके अन्…

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)


अभिनेता सलमान खानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘अंतिम’ चित्रपट पाहताना काही चाहते सिनेमागृहात फटाके फोडत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.सलमान खानचा ‘अंतिम’ हा चित्रपट शुक्रवारी मालेगावच्या सुभाष चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. रात्रीच्या शेवटच्या शो दरम्यान, सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या सलमानच्या काही चाहत्यांनी सिनेमागृहात फटाके फोडण्यास सुरुवात केली, ज्यामुळे सिनेमागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.  याप्रकरणी  पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आतापर्यंत एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.हा व्हिडीओ सलमान खानने इंस्टाग्रामवर शेअर करत त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.


हे ही वाचा – कोरियोग्राफर शिव शंकर यांचे निधन, सोनू सूदने लिहिली भावनिक पोस्ट म्हणाला…