Video: सलमान खान म्हणतोय प्यार ‘करो-ना’; टीजर रिलीज

सलामान खाननं त्याच्या या गाण्याचा टीझर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.

Salman backs the film industry in difficult times, helping crores of 25,000 employees
सलमान कठीण काळात पुन्हा फिल्म इंडस्ट्रीच्या पाठीशी, 25 हजार कर्मचार्‍यांना कोट्यावधींची मदत

संपुर्ण देशात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. यावेळी सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही थांबवण्यात आले असल्याने बॉलिवूड मंडळी सोशल मीडियावर आपला अधिकाधिक वेळ घालवताना दिसताय. बॉलिवूडच्या भाईजान सलमान खानने कोरोनाच्या जनजागृतीसाठी सलमानचे ‘प्यार करोना’ गाणे रिलीज केले आहे. या नवीन गाण्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या संदर्भातील माहिती सलमान खानने ट्विट करत आपल्या चाहत्यांनी दिली आहे. लॉकडाऊन दरम्यान सलमान खान आपल्या फॉर्मवर आयसोलेशनमध्ये असताना त्याने कोरोना व्हायरसवरील गाणं बनवले असून हे गाणे चाहत्यांच्या भेटीला आले आहे.

सलमान खान आणि हुसैन दलाल यांनी मिळून हे गाणं लिहिले आहे तर साजिद- वाजित यांनी गाण्याला संगीत दिले आहे. ‘इमोशनली पास और फिजिकली दूर रहो ना, प्यार करोना, असे लिहीत सलमानने हे गाणे सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. गाण्याच्या टीझरमध्ये #IndiaFightsCorona #StayHomeStaySafe #BeHuman हे हॅशटॅग सुद्धा वापरण्यात आले आहेत. या गाण्याचं विशेष म्हणजे सलमाननं हे गाणं घरी राहूनच शूट केले आहे.


बॉलिवूड- हॉलिवूड आलं एकत्र, स्थापन केली नवीन कंपनी!