घरमनोरंजनMovie Review: 'दबंग ३'वर चाहते खूष, प्रेक्षक मात्र नाराज!

Movie Review: ‘दबंग ३’वर चाहते खूष, प्रेक्षक मात्र नाराज!

Subscribe

तब्बल सात वर्षानंतर बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान चुलबुल पांडे बनत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यातच प्रभुदेवा आणि सलमान खान हे भन्नाट कॉम्बिनेशन तुमचं पुरेपुरे मनोरंजन करणार आहे. त्यात जर तुम्ही सलमानचे डाय हार्ट फॅन्स असाल तर हा चित्रपट तुमच्यासाठीच आहे. कारण आपल्या फॅन्सची आवड लक्षात घेऊनच सलमान खानने हा चित्रपट केला आहे.

जबरदस्त अॅक्शन्स, भन्नाट कॉमेडी आणि रोमान्सने भरलेली ही फिल्म असली तरी चित्रपटाची कथा कुठेतरी अपूर्ण असल्यासारखी वाटते. चित्रपटाची सुरूवात तुफान अॅक्शनने सुरू होते. ज्यात चुलबुल पांडे एका लग्नातून सोनं लुटणाऱ्या गुंडांना पकडतो आणि दागिने सोडवतो. यावेळी त्याचा सामना माफिया सरगन बालीबरोबर होतो. हा तोच बाली आहे ज्याच्याकडून चुलबूलने सगळं काही काही काढून घेतलं होतं. आता बाली पुन्हा एखदा चुलबुलच आयुष्य उध्दवस्त करण्याच्या तयारीत आहे. आता चुलबुलला पोलिसाबरोबर आपल्या परिवाराला सांभाळण्याच कर्तव्य पार पाडायचं आहे.

- Advertisement -

चित्रपटात अॅक्शनबरोबर खुशी म्हणजेच सई मांजरेकर आणि सलमानचा रोमान्सही बघायला मिळतो. पण ंतर अस कीही होतकी चुलबुलचं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. आणि सुरू होतं रिवेंज ड्रामा.

ज्याप्रमाणे चित्रपटाच्या कथेच दम नाहीये त्याचप्रमाणे प्रभुदेवाचं डिरेक्शनचाही फार प्रभाव पडत नाही. सलमान खानवर संपूर्ण फिल्म खेचण्याचा प्रयत्न केला आहे. खरतर दबंग १ आणि २ लोकांच्या लक्षात राहीला तो त्यातील भन्नाट डायलॉगमुळे पण ही डॉयलॉगची जादू दबंग ३ मध्ये कुठेच दिसत नाही. अनेक ठिकाणी कॉमेडी सीनने देखील माती खाल्ली आहे. ते कॉमेडी सीन्सबघून नेमकं हसाव की आपण चित्रपट बघायला का आलो म्हणून रडावं हेच प्रेक्षकांना कळत नाही.

- Advertisement -

 

त्यातल्यात सलमानचा स्वॅग आणि सोनाक्षी, सईची अॅक्टीगचा थोडाफार प्रभाव प्रेक्षकांवर पडतो. एकूण अडीच तासांचा हा चित्रपट आहे. पण उगाचच ताणला गेला आहे. काही सीन्सला कात्री लागली असती तरी चाललं असतं. मी तर म्हणेन हा चित्रपट केवळ सलमानच्या पॅन्सला डोळ्यासमोर ठेवूनच लिहीली आणि डिरेक्ट केली आहे. त्यामुळे तुम्ही भाईजानचे चाहते असाल तरच या विकेंडला तुम्ही दबंग ३ बघायला जा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -