Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन 'मास्टर'च्या हिंदी रिमेक मध्ये भाईजानची वर्णी ?

‘मास्टर’च्या हिंदी रिमेक मध्ये भाईजानची वर्णी ?

सिनेमात काम करण्यास सलमान सज्ज असल्याचे कळतेय. पण अद्याप लॉक डाऊन मुळे काही गोष्टी अडकल्या आहेत.

Related Story

- Advertisement -

अभिनेता सलमान खान (Salman Khan) सध्या कमालीचा व्यस्त आहे. नुकतच सलमानचा ‘राधे’ हा सिनेमा रिलीज झाला होता. यानंतर त्याचे शेड्यूल पुढील 2 वर्षांसाठी तरी पूर्ण पॅक असल्याचे कळतेय. कभी ईद कभी दिवली,अंतिम,कीक 2,टायगर 3  सारख्या अनेक सिनेमामध्ये भाईजान झळकणार आहे. इतकचं  नाही तर आता सलमान पुन्हा 2 बिग बजेट सिनेमाची घोषणा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. वृत्तानुसार  सलमान लवकरच ‘मास्टर’ (Master) या तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक बनवणार आहे. ‘मास्टर’ सिनेमात सुप्रसिद्ध दक्षिणात्य सुपरस्टार विजय थलापति (Thalapathy Vijay) आणि विजय सेथूपती ( Vijay Sethupathi)हे स्टार झळकले होते. काही महिन्यांपूर्वीच हा सिनेमा रिलीज झाला होता आणि प्रेक्षकांनी सिनेमाला चांगलीच पसंती दिली होती. सिनेमात सलमान खान विजय थलापति याची भूमिका साकारणार आहे. निर्मात्यांचे म्हणणे आहे की सलमान खान सारखा सुपर स्टार या सिनेमासाठी परफेक्ट आहे तसेच हा सिनेमा  ब्लॉकबस्टर ठरणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

- Advertisement -

सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार सलमानला हा सिनेमा खूप आवडला आहे. तसेच सिनेमात काम करण्यास सलमान सज्ज झाला आहे  पण अद्याप लॉक डाऊन मुळे काही गोष्टी अडकल्या आहेत. आता पुन्हा या सिनेमा बद्दल चर्चा होणार आहे. तसेच सिनेमाच्या शूटिंगची डेट आणि दिग्दर्शकाची तयारी सुरू आहे.

हा सिनेमा एक अॅक्शन आणि ड्रामाने भरूपर असणार आहे. तसेच सलमान सध्या सुट्ट्या एंजॉय करणायसाठी बाहेर गेला आहे. तेथून परतल्यावर सिनेमाची अधिकृतरित्या घोषणा करणार आहे.


- Advertisement -

हे हि वाचा – कडाक्याच्या भांडणानंतर सुनील ग्रोवर पुन्हा कपिल शर्मासोबत काम करण्यास उत्सुक

- Advertisement -