घरमनोरंजन...आणि चिडून सलमान खानने दिला कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा!

…आणि चिडून सलमान खानने दिला कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा!

Subscribe

बॉलीवूडचा दंबग अभिनेता सलमान खान याने त्याच्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. त्याला कारणही तसच आहे. सलमान खान याने लॉकडाऊनच्या काळात प्यार करोना आणि तेरे बिना ही दोन गाणी प्रेक्षकांसाठी आणली. त्यानंतर त्यांच्यासोबत काम करण्यासाठीचे ऑफर्स असल्याच्या अफवांना ऊत आले आहे. मात्र सलमान खानने चिडून आपल्या ट्विटर हँडलवर त्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. नुकतेच सलमान खानच्या निर्मितीत दोन गाण्याचे प्रदर्शन करण्यात आले आहे. त्यामुळे सलमानकडे चित्रपटात काम करण्यासाठीच्या इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

- Advertisement -

काय आहे सलमानचे ट्विट

मी हे स्पष्ट सांगू इच्छितो की, मी किंवा माझे सलमान फिल्म निर्मिती सध्या तरी कोणाताही चित्रपट बनवण्याच्या विचारात नाही. त्यामुळे चित्रपटाचे कास्टिंगही करत नाहीत. आम्ही आमच्या आगामी चित्रपटासाठी कोणत्याही कास्टिंग एजंटला नेमलेले नाही. या संदर्भात कोणताही मेल किंवा मेसेज आला तर त्यावर विश्वास ठेऊ नका. जर कोणी चुकीच्या पद्धतीने माझ्या व माझ्या फिल्म प्रोडक्शनच्या नावाचा वापर करत असेल तर मी कायदेशीर कारवाई करेन, असे सलमान खानने ट्विटमध्ये नमूद केले आहे. तसेच सलमान खानने चाहत्यांनाही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन केले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे सलमान खान लॉकडाऊन असल्याने पनवेल येथील फार्महाऊसवर अडकला आहे. त्याच्यासोबत त्याचे कुटुंबिय आणि काही मित्र परिवारही आहे. या काळात त्याने अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

रेल्वेकडून ३० जूनपर्यंत प्रवासी तिकिटांचं बुकिंग केले रद्द

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -