बॉलिवूड अभिनेता सलमान खान मागील अनेक दिवसांपासून त्याच्या ‘बिग बॉस ओटीटी 2’ या रियालिटी शोमुळे चर्चेत होता. अशातच, नुकताच सलमान त्याच्या एका नव्या लूकमुळे चर्चेत आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून काहीजण सलमानच्या या लूकला ट्रोल करताना दिसत आहेत.
सलमानने केलं टक्कल
View this post on Instagram
रविवारी रात्री सलमान खानला स्पॉट करण्यात आलं. यावेळी सलमानने ब्लॅक शर्ट आणि जीन्स परिधान केली होती. मात्र, सर्वांचे लक्ष यावेळी सलमानने केलेल्या टक्कलकडे होतं. सलमानला या नव्या लूकमध्ये पाहून चाहत्यांनी नव्या चित्रपटाचा अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. आता सलमान खान ‘तेरे नाम 2’ हा चित्रपट घेऊन येणार असल्याचा दावा अनेकांनी केला आहे.
युजर्सने उडवली खिल्ली
दरम्यान, सलमानचा हा लूक पाहून अनेकांनी त्याची खिल्ली उडवली आहे. एका यूजरने सलमान खानला ‘म्हातारा म्हटलं आहे’. तर दुसऱ्याने लिहिलंय की, ‘नव्या आर्मी चित्रपटासाठी लुक टेस्ट’
सलमानचा आगामी चित्रपट
येत्या काही दिवसात सलमानचा ‘टायगर 3’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याव्यतिरिक्त तो ‘बिग बॉस 17’मध्ये देखील दिसणार आहे.