Samantar 2: सईच्या एन्ट्रीनंतर ‘समांतर-२’ मध्ये नवे वळण, दुसरा सिझन ठरतोयं सुपरहिट

samantar 2 web series hit on mx player ott platform sai tamhnkar look glamerous in web series
Samantar 2: सईच्या एन्ट्रीनंतर 'समांतर-२' मध्ये नवे वळण, दुसरा सिझन ठरतोयं सुपरहिट

मराठीतील बहुचर्चित ‘समांतर’ वेबसीरिजच्या पहिल्या सिझनने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. अभिनेता स्वप्निल जोशी याची ही पहिली वेबसीरिज होती. या वेबसीरिजमधील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. पहिल्या सिझनला प्रेक्षकांचे सुपरहिट मिळवत समांतर-२ वेबसीरिजचा दुसरा सिझन नुकताच रिलीज झाला. ‘समांतर २’च्या ट्रेलरला सोशल मीडियावर लाईक्स, कमेंट्स, मिम्सचा जणू पूरचं आला. त्यामुळे समांतर-२ च्या दुसऱ्य़ा सिझनमधील नवनवीन पात्र आणि कथा उत्कांठा अधिकचं वाढवतेय. नितीश भारद्वाज आणि स्वप्नील जोशी, तेजस्वीनी पंडित यांनी या मालिकेमध्ये दर्जेदार रंग भरले आहेत पण या मालिकेच्या दुसऱ्या पर्वामध्ये सई ताम्हणकर आल्याने या मालिकेमध्ये वेगळीच जान आणि ग्लॅमर प्राप्त झाले आहे.

पहिल्या सिझनला जो प्रतिसाद मिळाला त्याची पुनरुक्ती करत ‘समांतर’च्या दुसऱ्या सिझनलाही दिसून आली. ओटीटीवर सध्या या दुसऱ्या सिझनलाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत ५६ दशलक्ष प्रेक्षकांनी ही वेबसीरज पाहिली. ‘एमएक्स प्लेयर’वर अलीकडेच ही वेबसिरीज प्रदर्शित झाली. या वेबसिरीजची निर्मिती जीसिम्स (ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट अँड मिडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड)ची असून या कंपनीचे प्रमुख अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार हे आहेत. ही वेबसीरिज आता प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.

“समांतर-२’ला भरभरून यश मिळणार याबाबत आम्हाला खात्री होती, कारण यातील सर्वच गोष्टी अचूकपणे जुळून आल्या आहेत. दुसऱ्या भागाला जो प्रतिसाद मिळतो आहे, त्याने मला खूप आनंद झाला आहे. मला याचाही आनंद आहे की मी माझ्या करियरमध्ये जे नवीन प्रयोग करत आहे त्यांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद लाभतो आहे. या सर्व यशाचे श्रेय खासकरून निर्माते अर्जुन आणि कार्तिक यांना तसेच दिग्दर्शक समीर विद्वांस यांना आहे. त्यांनी सर्जनशिलतेच्या बाबतीत जे श्रम घेतले आणि चित्रीकरणाच्या बाबतीत जो दर्जा सांभाळला त्याला तोड नाही,” असे उद्गार अभिनेता स्वप्निल जोशी यांनी काढले आहेत. ते या मालिकेत कुमार महाजन या प्रमुख व्यक्तिरेखेच्या भूमिकेत आहेत.

स्वप्निल जोशी आणि नितीश भारद्वाज यांना एकत्रित या वेब सिरीजमध्ये आणण्याच्या आपल्या निर्णयाबद्दलही निर्मात्यांनी खुलासेवार सांगितले. “जगभरात या दोघांना त्यांनी दोन वेगळ्या मालिकांमध्ये केलेल्या कृष्णाच्या भूमिकांसाठी ओळखले जाते. ‘समांतर’च्या माध्यमातून या दोन प्रतिभावान कलाकारांना समोरासमोर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळते आहे. त्याचप्रमाणे आम्ही जेव्हा सई ताम्हणकरची सुंदरा व मिराच्या व्यक्तिरेखांसाठी निवड केली तेव्हा अनेक नावे आम्हाला सुचवली गेली होती. परंतु आम्ही सईच्या नावावर ठाम होतो. आम्हाला माहित होते की, सुंदराच्या व्यक्तिरेखेला केवळ तीच न्याय देऊ शकेल,” अर्जुन आणि कार्तिक म्हणाले.


SSC Result 2021 : ‘त्या ०.०५ वाल्यांना विधान परिषदेत घ्या’ सोशल मीडियावर मिम्सचा महापूर