सामंथा नागा चैतन्यामध्ये अखेर घटस्फोट, सोशल मीडियावर केले जाहीर

samantha share story on her social media after unfollows naga chaitanya
नागा चैतन्यला अनफॉलो केल्यानंतर समंथाची पोस्ट, म्हणाली...

‘फॅमिली मॅन २’ (Family Man 2) मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने (samantha ruth prabhu) पती आणि अभिनेता नागा चैतन्यासोबत (Naga Chaitanya) घटस्फोट घेण्याबाबत निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून सामंथा आणि नागा चैतन्यामध्ये घटस्फोट होणार असल्याच्या बातम्या चर्चेत होत्या. आता सामंथा स्वतः याबाबत सांगितले आहे. सामंथाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून सर्व चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे. शिवाय तिने अशा वाईट वेळेत समजून घेण्याचे आणि तिला साथ देण्याचे आवाहन सामंथाने चाहत्यांना केले आहे. (Samantha confirms separation with Naga Chaitanya)

सामंथाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘खूप विचार केल्यानंतर मी आपल्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आता आमचे मार्ग वेगवेगळे आहेत. आम्ही भाग्यवान आहोत की, आम्ही गेल्या एक दशकापासून चांगले मित्र आहोत. आता ही आम्ही एक चांगला बाँड शेअर करत आहोत. आम्ही आपल्या चाहत्यांना, शुभचिंतकांना आणि माध्यमांना आवाहन करतो की, या कठीण काळात आम्हाला साथ द्या आणि आमच्या प्रायव्हसीची काळजी घ्या. तुमच्या आधारासाठी धन्यवाद.’

 

View this post on Instagram

 

A post shared by S (@samantharuthprabhuoffl)

‘मी हैदराबाद सोडणार नाही’

अलीकडेच सामंथाने इन्स्टाग्राम लाईव्ह सेशन दरम्यान ‘ए हंडरड अदर रुमर’वर अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. त्यावेळेस एका चाहत्याने सामंथाला विचारले की, ‘हैदराबाद सोडून मुंबईत शिफ्ट होणार आहे का?’ यावर ती म्हणाली की, ‘याबाबतची बातमी खोटी आहे. मी हैदराबाद सोडून कुठे जाणार नाही आहे.’


हेही वाचा – कंगनाने घेतली योगी आदित्यनाथांची भेट; ODOP ची बनली ब्रँड अँबेसेडर