‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ चित्रपटात समंथा आणि विक्की कौशल एकत्र

टॉलिवूड अभिनेत्री समंथा रूथ प्रभूची कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सध्या तिच्या ‘फॅमिली मॅन २’ च्या सफलतेमुळे ती चर्चेत आहे. तसेच मागील काही दिवसांपासून समंथा रूथ प्रभू अभिनेता आयुष्मान खुराना सोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा चालू होत्या. दरम्यान आता समंथाला बॉलिवूडच्या आणखी एका चित्रपटात काम करण्याची संधी मिळणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, दिग्दर्शक आदित्य धर यांच्या ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ चित्रपटासाठी अभिनेत्रा समंथा बोलणी करत आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अभिनेता विक्की कौशल मुख्य भूमिकेत असणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

मागील बऱ्याच दिवसांपासून दिग्दर्शक आदित्य धर ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ चित्रपटासाठी तयारी करत आहेत. २०२३ मध्ये हा चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होईल. सध्या या चित्रपटाच्या कास्टिंगबाबत चर्चा चालू आहे, दिग्दर्शकांनी यासाठी समंथाची निवड केलेली असून समंथाला सुद्धा या चित्रपटाती कथा आवडलेली आहे. खरंतर ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ या चित्रपटाची घोषणा जानेवारीमध्ये विक्की कौशल सोबत करण्यात आली होती. मात्र काही आर्थिक अडचणींमुळे काही काळासाठी या चित्रपटाचं काम पुढे ढकलण्यात आलं होतं. दरम्यान आता पुन्हा या चित्रपटांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, समंथा प्रभू आता आयुष्मान खुराना आणि विक्की कौशलनंतर अभिनेता अक्षय कुमारसोबतही तिच्या तिसऱ्या बॉलिवूड चित्रपटातही काम करणार असल्याची चर्चा सुरू आहे.

 


हेही वाचा :जय माँ कलकत्ते वाली,तेरा श्राप ना जाये खाली…, काली प्रकरणादरम्यान अनुपम खेर यांचं ट्वीट चर्चेत