नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाच्या नात्यावर समंथाने दिलं सडेतोड उत्तर

साउथची सुप्रसिद्ध अभिनेत्री समंथा रूथ प्रभु वारंवार वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. आता नुकत्याच एका प्रकरणामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मागील काही महिन्यांपूर्वी नागा चैतन्य आणि समंथाचा घटस्फोट झाला. त्यांच्या अचानक झालेल्या घटस्फोटामुळे दोघांच्याही चाहत्यांना मोठ्ठा धक्का बसला होता. आता दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले असून आपापल्या करिअरवर फोकस करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, आता नागा चैतन्य अभिनेत्री शोभिता धुलिपालाला डेट करत आहे. नागा चैतन्यच्या डेटिंगची बातमी आता समोर येत आहे. आणि नागा चैतन्य आणि शोभिताच्या या अफेयर मुळेच त्यांचा घटस्फोट झाला असे आरोप समंथाच्या चाहत्यांनी नागा चैतन्यवर केले.

दरम्यान समंथा प्रभू याबाबत एक गंभीर ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये तिने लिहिलंय की, “कोणत्याही मुलीबाबत एखादी अफवा आहे, म्हणजे ती खरी असेल. आणि जर कोणत्याही मुलाबाबत एखादी अफवा आहे, म्हणजे नक्कीच ती त्या मुलीने पसरवली असेल. मोठे व्हा मित्रांनो….तुम्ही ज्या दोन लोकांबद्दल बोलत आहात, ते दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे निघून गेले आहेत. तुम्हाला सुद्धा हा विषय सोडून द्यायला हवा, आपल्या कामावर लक्ष ठेवा, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. सोडून द्या!!”

शोभिता आणि नागाचैतन्य वारंवार एकत्र
सूत्रांच्या माहितीनुसार नागाचैतन्य आणि शोभिता वारंवार एकत्र असतात. अनेक वेळा दोघांना एकत्र स्पॉट केलं जातं.

२०१७ मध्ये झालं होत समंथा आणि नागाचैतन्यचे लग्न
समंथा प्रभू आणि नागाचैतन्यने २०१७ मध्ये लग्न केले होते. तसेच सप्टेंबर २०२१ मध्ये दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.