साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिचे वडील जोसेफ प्रभू यांचे निधन झाले आहे. समांथाने ही दुःखद बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
समंथा रुथ प्रभूने काही वेळापूर्वी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरी शेअर केली आहे. “बाय डॅड, तोपर्यंत जोवर आपली पुन्हा भेट होत नाही.” यासोबतच तिने एक हार्टब्रेक इमोजी शेअर केला आहे. समंथाचे वडील जोसेफ हे तेलुगू अँग्लो इंडियन होते. तिच्या आईचं नाव निनेत्ते प्रभू आहे.
समंथाचा जन्म चेन्नईत झाला. आता तिच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले आहे. याचा तिला धक्का बसला आहे. कालच समंथा तिच्या ‘सिटाडेल हनी बनी’ सीरिजच्या सक्सेस पार्टीत सहभागी झाली होती. आज मात्र तिला या दु:खद प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे. समंथाच्या वडिलांचं नेमकं कशामुळे झालं हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही.
काही दिवसांपू्र्वीच समंथा तिच्या वडिलांविषयी बोलताना म्हणाली होती की “माझं वडिलांसोबतचं नातं तसं कठीणच होतं. मला माझ्या हक्कांसाठी लढावं लागायचं. माझ्या वडिलांनी माझ्यावर अनेकदा अविश्वास दाखवला. तू इतकी स्मार्ट नाहीस असंही ते मला म्हणायचे.”
‘या’ आजाराशी झुंज देतेय समंथा!
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये समंथाने सांगितले होते की, तिला मायोसायटिसचा त्रास आहे. ही एक ऑटोइम्यून स्थिती आहे, ज्यामध्ये रुग्णाच्या स्नायूंवर त्याच्याच रोगप्रतिकारक शक्तीद्वारे हल्ला केला जातो. ज्यामुळे शरीरात खूप वेदना होऊ लागतात. मायोसिटिसमुळे स्नायू खूप तीव्र दुखतात. ही एक अशी समस्या आहे, ज्यामध्ये स्नायू कमकुवत होतात आणि दैनंदिन काम करणे खूप कठीण होते.
हेही वाचा : Maeri trailer : कुटुंब, न्याय आणि सूड दाखवणारी थरार ड्रामा सिरीज
Edited By – Tanvi Gundaye