समांथा रुथ प्रभू व नागाचैतन्य हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपल होते. नागाचैतन्य व समांथाने 2017 साली लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. परंतु, अवघ्या चारच वर्षात त्यांचा सुखाचा संसार मोडला. 2021 मध्ये घटस्फोट घेत नागाचैतन्य व समांथा वेगळे झाले.
वर्षभराच्या विश्रांतीनंतर साऊथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने पुन्हा अभिनयाला सुरुवात केली आहे. ती बऱ्याच काळापासून मायोसिटीस या आजाराने ग्रस्त होती. तब्येतीवर लक्ष देण्यासाठी समंथा गेल्या वर्षभरापासून ब्रेकवर होती. तिच्या उपचारासाठी तिने अभिनयातून ब्रेक घेतला होता. मात्र आता ती पुन्हा कामावर रुजू झाली आहे. ज्याबद्दल तिने स्वत: सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आणि त्यावेळी ती तिच्या तब्येतीबद्दल बोलली आहे.
या पॉडकास्टबद्दल उत्साहित आहे- समंथा
सामंथाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना पुन्हा कामावर रुजू झाल्याची आनंदाची बातमी दिली आहे. तिने तिचे काम पुन्हा सुरू केल्याचे सांगितले. यावेळी सामंथाने तिच्या आरोग्य पॉडकास्टची घोषणा केली, या व्हिडिओमध्ये समंथा म्हणाली, ‘होय, मी शेवटी कामावर परत जात आहे, पण त्याशिवाय, त्यादरम्यान मी पूर्णपणे बेरोजगार होते.’ समंथा पुढे म्हणाली की, “मी माझ्या एका मित्रासोबत मिळून मजेदार गोष्ट करत आहे. हे एक आरोग्य पॉडकास्ट आहे जे अनपेक्षित आहे. पण हे काही असे आहे जे मला आवडते. याबाबत मी फार उत्साही आहे. हे पॉडकास्ट पुढच्या आठवड्यात रिलीज होणार आहे. मला आशा आहे की, आपल्यातील अनेकांना याचा वास्तवात उपयोग होईल. मला ते पॉडकास्ट करतानाही खूप मजा आल्याचे ती सांगते”.
अॅक्शन थ्रीलर ‘सिटाडेल’ची सिनेमाची शुटींग संपवल्यानंतर समांथाने आपल्या आरोग्यावर लक्ष देण्यासाठी काही काळासाठी ब्रेक घेतला होता. या दरम्यान तिने अमेरिकेत जाऊन मायोसायटीसवर उपचार घेतले आणि भरपूर ठिकाणी फिरली. सामंथा शेवटची ‘खुशी’ या सिनेमात पाहिले गेले, ज्यामध्ये साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाही होता.
‘सिटाडेल’मध्ये वरुणसोबत दिसणार
कामाच्या आघाडीवर, समंथा आता वरुण धवनसोबत ‘सिटाडेल’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी समंथा गेल्या वर्षी जुलैपर्यंत या वेब सीरिजसाठी शूटिंग करत होती. अलीकडे, तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून, त्याने सांगितले होते की निर्मात्यांनी तिला आणि वरुणला या शोची पहिली झलक दाखवली आहे. या मालिकेशिवाय सामंथाने ‘चेन्नई स्टोरीज’ देखील साइन केले आहे जो तिचा पहिला परदेशी चित्रपट असेल.